हैदराबाद ENCOUNTER : 'ठोकशाही'ने मिळालेला न्याय..,राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

हैदराबाद ENCOUNTER : 'ठोकशाही'ने मिळालेला न्याय..,राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत हैदरबाद पोलिसांचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातले चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. या घटनेनंतर देशभरात एकच जल्लोष करण्यात आला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली. 'कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो.' अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्या ठिकाणी या चार आरोपींनी माणुसकीला काळीमा फासणारं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं त्याच घटनास्थळावर गुन्ह्याचा सीन रिक्रियेट करण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन गेले होते. मात्र, त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु आरोपी थांबले नाही. त्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी ही माहिती दिली.

बलात्कार प्रकणातल्या आरोपींचा एन्काऊंटर झाल्याची बातमी सकाळच्या सुमारास नागरिकांना  कळाली. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. पुलावर नागरिक आणि पुलाखाली पोलीस असं चित्र होतं. पुलावरून नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टीही केली. आरोपींचं एन्काऊंटर झाल्यानं, आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांतता लाभेल, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली.

असं झालं एन्काऊंटर, पोलिसांचा खुलासा

आज सकाळी पावणे सहा वाजता चारही आरोपींना आम्ही घटनास्थळी नेलं. त्यांनी अचानक दगड आणि लाठ्यांनी पोलिसांवर हल्ला केला. तरी पोलिसांनी धीरानं घेत त्यांना आत्मसमर्पण करायला सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. उलट पोलिसांकडून पिस्तुलं हिसकावून गोळीबार सुरू केला. आता पोलिसांकडे पर्याय उरला नाही आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्या. काही वेळानं त्यांच्याकडून गोळीबार बंद झाला. जेव्हा आम्ही जाऊन तपासलं तेव्हा सर्व 4 आरोपींना गोळ्या लागल्या होत्या आणि ते मृत्युमुखी पडले होते. दोन पोलीसही यात जखमी झाले, पण गोळीबारामुळे नाही तर दगड लागल्यामुळे, असं सज्जनार

म्हणाले.

एन्काऊंटरचा घटनाक्रम

पहाटे घडलं हैदराबाद एन्काऊंटर

चौघा आरोपींना पोलिसांनी केलं ठार

आरोपींना होती 19 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

चौकशी करण्यासाठी तुरुंगातून घटनास्थळी नेलं

आरोपींनी अनेक गोष्टी उघड केल्या

'दिशा'चा मोबाईल कुठे आहे, याची माहिती दिली

घटनास्थळी चौकशीदरम्यान दिशाभूल करण्याचा प्रयत्न

चौघांकडून पोलिसांवर दगडफेक

घटनास्थळावरच्या काठ्या पोलिसांवर फेकल्या

दोघा आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावली

आरोपींनी पोलिसांवर केला गोळीबार

आत्मसमर्पणाच्या सूचना करूनही जुमानलं नाही

अखेर पोलिसांचा प्रत्युतरादाखल गोळीबार

चौघांपैकी दोघा आरोपींकडे सापडली शस्त्रं

एन्काऊंटरमध्ये 2 पोलीस अधिकारी जखमी

सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांचा अल्पपरिचय

- 1996 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी

- मार्च 2018 मध्ये सायबराबादचे पोलीस आयुक्त

- एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून आंध्र प्रदेश, तेलंगणात ओळख

- वारंगलमधील इंजिनीअरिंगच्या तरुणीवरील अॅसिड हल्ल्यातील 3 आरोपींचा एन्काऊंटर

- वारंगल एन्काऊंटरनंतर सज्जनार प्रकाशझोतात

-  वारंगलमधील एन्काऊंटरवरुन मोठा वाद उफाळला, नागरिकांचा प्रचंड पाठिंबा

================

 

Published by: sachin Salve
First published: December 6, 2019, 10:10 PM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading