राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात, शर्मिला यांना मुक्कामार, गेले होते एकवीरेच्या दर्शनाला

राज ठाकरे यांच्या गाडीला अपघात, शर्मिला यांना मुक्कामार, गेले होते एकवीरेच्या दर्शनाला

राज हे पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे यांच्यासह शनिवारी कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते.

  • Share this:

मुंबई,5 ऑक्टोबर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवी मुंबईत गाडीला अपघात झाला. यात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शर्मिला या राज यांच्यासोबत कार्ला येथे एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परत येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, राज हे पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि कन्या उर्वशी ठाकरे यांच्यासह शनिवारी कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनाला गेले होते. दुपारी दीड वाजता दर्शनावरून परतत असताना राज यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात झाला. नवी मुंबईतील सानपाड्याजवळ हा अपघात झाला आहे. 2 इनोव्हा आणि 1 सिलेरो या गाड्यांचा अपघात झाला आहे. तिन्ही गाड्यांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्याने अपघात झाला. या अपघातात शर्मिला ठाकरे यांना किरकोळ दुखापत झाली आहे. राज ठाकरे सुखरूप असून ते घरी पोहोचले आहेत. शर्मिला ठाकरे यांच्या कारमध्ये राज ठाकरे यांची बहीण आणि त्याचे स्वीय सहाय्यक सचिन मोरे हे देखील होते.

अचानक कारसमोर आली रिक्षा

दरम्यान, एकवीरा देवीचे दर्शन घेऊन मुंबईला परतत असताना राज यांची गाडी सानपाड्याजवळ आली असता त्याचवेळी अचानक समोर रिक्षा आली. त्याला कारची धडक बसू नये यासाठी गाडीचालकाने ब्रेक मारला. त्यामुळे त्यांच्या गाडीवर मागून येणारी गाडी आदळली. या अपघातात राज यांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा अपघात झाल्याचं समजताच राज ठाकरे यांच्यात ताफ्यातील इतर सुरक्षारक्षक तात्काळ बाहेर येत त्यांनी अपघातग्रस्त गाड्या बाजूला घेतल्या. चवेळी वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, राज ठाकरे यांचा ताफा काहीसा पुढे गेला होता.

शर्मिला ठाकरे यांना मुक्कामार..

या अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुक्कामार बसल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर या गाडीत सगळे जण दुसऱ्या गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

VIDEO: मोजत बसा! उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घेऊन आला 10 रुपयांचे चिल्लर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2019 04:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading