'इंजिन'ला ट्रॅकवर आणण्यासाठी राज ठाकरे लागले कामाला, प्रत्येक कार्यकर्त्याला भेटणार

'इंजिन'ला ट्रॅकवर आणण्यासाठी राज ठाकरे लागले कामाला, प्रत्येक कार्यकर्त्याला भेटणार

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी अखेर कामाला लागले आहे. राज ठाकरे स्वत : कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे.

  • Share this:

08 जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी अखेर कामाला लागले आहे. राज ठाकरे स्वत : कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं गेलेल्या मनसेचा सुपडा साफ झाला. आता हा शेवटचा पराभव आहे अशी गर्जना राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे पक्षाच्या पुनर्बांधणीच्या कामाला लागले आहे.

राज ठाकरे मुंबईत पुढच्या काही दिवसांत विभागनिहाय 36 बैठका घेणार आहेत. दररोज 2 या हिशेबानं ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. राज ठाकरे स्वतः विविध विभागांमध्ये जाणार आहेत. याची सुरुवात होणार आहे दक्षिण मुंबईपासून..

सोमवारी राज पहिली बैठक घेतील. 2019च्या दिशेनं राज यांनी तयारी सुरू केल्याचं दिसतंय. कारण 2019मध्ये एप्रिलमध्ये लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 07:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading