फटाकेही व्हाॅट्सअॅपवर फोडायचे का ?,राज ठाकरेंचा फटाकेबंदीला विरोध

"वर्षानुवर्षे साजरे होणाऱ्या सणांवर बंधने यायला लागली तर सर्वच सण कायमस्वरूपी बंद करा, सर्व सणांच्या सुट्ट्याही रद्द करा"

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2017 06:41 PM IST

फटाकेही व्हाॅट्सअॅपवर फोडायचे का ?,राज ठाकरेंचा फटाकेबंदीला विरोध

10 आॅक्टोबर : फटाकेबंदीला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवलाय. यापुढे फटाकेही व्हाॅट्सअॅपवर फोडायचे का ? असा सवालच राज ठाकरे यांनी उपस्थितीत केलाय.

दिल्ली हायकोर्टाने दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी आणलीये. राज्यातही फटाकेबंदीची निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारून घेऊ असं सूचक वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सेनेतले मतभेद चव्हाट्यावर आलेत. संजय राऊतांनी उघडपणे फटाकेबंदीला विरोध दर्शवलाय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फटाकेबंदीला विरोध दर्शवत कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वयोवृद्ध लोकांना जिथे त्रास होतो तिथे फटाके वाजवताना लोकांची काळजी घ्यावी.

परंतु, वर्षानुवर्षे साजरे होणाऱ्या सणांवर बंधने यायला लागली तर सर्वच सण कायमस्वरूपी बंद करा, सर्व सणांच्या सुट्ट्याही रद्द करा अशी टीका राज ठाकरेंनी केली.

तसंच यापुढे फटाकेही व्हाॅट्सअॅपवर फोडायचे का ? असा सवाल विचारत खरंतर कोर्टाने अतिरेक्यांना सांगितले पाहिजे की इथे बॉम्ब फोडू नका असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 10, 2017 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...