मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'या परिस्थितीतही खंबीर राहा', मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचं सांत्वन पत्र

'या परिस्थितीतही खंबीर राहा', मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचं सांत्वन पत्र

Raj Thackeray Letter: राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना सांत्वन पत्र पाठवलं आहे.

Raj Thackeray Letter: राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना सांत्वन पत्र पाठवलं आहे.

Raj Thackeray Letter: राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना सांत्वन पत्र पाठवलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 26 मे: सध्या महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचं सावट आहे. देशभर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव दिसून येतोय. कोरोनासारख्या या महामारीच्या काळात अनेकांनी आपले कुटुंबातले सदस्य गमावले. कोरोनाच्या संकटात अनेकांच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला. याच पार्श्वभूमी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना सांत्वन पत्र (Condolence Letter ) पाठवलं आहे. कोरोना व्हायरसमुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या मनसे कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरे यांनी सांत्वन केलं आहे. स्थानिक मनसे नेते कार्यकर्ते राज ठाकरे यांचं हे पत्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवून त्यांना धीर देत आहे. प्रत्येक विभाग अध्यक्षावर हे पत्र कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानुसार माहिम विभागाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी त्यांच्या विभागात पत्र कायकर्त्यांच्या घरी पोहोचवली. हेही वाचा- पुणेकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी, शहरात डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या वाढली  यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं की, राज ठाकरे यांनी आपल्या मनसे कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे. पत्र लिहून त्यांनी कार्यकर्त्यांना धीर देत त्यांचं सांत्वन केलं आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपले आप्तेष्ट गमावले. अशा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांचं सांत्वन करणं शक्य नाही. सध्याची परिस्थिती दुःखाची आहे. मात्र या काळातही खंबीर राहा, असं राज ठाकरेंनी पत्रात आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. राज ठाकरेंनी काय लिहिलं पत्रात आपल्या कुटुंबातील सदस्याच्या निधनाची दुःखद वार्ता समजली. अतिशय वाईट वाटले. आपल्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा किती मोठा डोंगर कोसळला असेल याची कल्पना मी करु शकतो. इतक्या वर्षांचं आपलं नातं क्षणार्धात अनंतात विलीन झालं. हा धक्का मोठा आहे. त्याला धीरानेच तोंड द्यायला पाहिजे. परिस्थिती दुःखाची असली तरी या काळात खंबीर राहून आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी. एकत्र राहून या महामारीतून पुढचा मार्ग काढावा आपल्या या दुःखद क्षणी मी, माझे कुटुंबिय आणि माझे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या सोबत आहोत, आपल्या दुःखात सहभागी आहोत. आपल्या सर्वांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो हीच मनोमन प्रार्थना ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो आपला नम्र, राज ठाकरे
First published:

Tags: Coronavirus, MNS, Raj Thackeray

पुढील बातम्या