राज ठाकरे निघाले मुख्यमंत्र्यांना भेटायला, हे आहे मोठं कारण

राज ठाकरे निघाले मुख्यमंत्र्यांना भेटायला, हे आहे मोठं कारण

या 2 महत्त्वाच्या कारणांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण यात आणखी काय राजकीय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काही वेळातच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या दोघांच्या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, राज ठाकरे हे सध्या त्यांच्या मुलाच्या म्हणजे अमित ठाकरेच्या लग्नात व्यग्र आहेत. ते सध्या सगळ्यांना आमंत्रण पत्रिका देण्यासाठी राजकीय मंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत.

दरम्यान, आताही ते अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी वर्षा बंगल्यावर जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. तर यावेळी भेटीवेळी राजकीय चर्चादेखील होणार असल्याचं बोललं जात आहे.

तर दुसरीकडे मुंबईत बेस्ट संपाचा आजचा 7वा दिवस आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या संपाला मनसेकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे त्यासंदर्भातदेखील चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही. त्यामुळे सरकाराल धडा शिकवण्यासाठी मनसैनिकांनी तयार राहण्याचं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

त्यामुळे या 2 महत्त्वाच्या कारणांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण यात आणखी काय राजकीय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राज ठाकरेंनी गुप्तपणे पाठवले 2 दूत, राहुल गांधींना दिलं अमितच्या लग्नाचं निमंत्रण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलगा अमितच्या लग्नाचं निमंत्रण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिलं. राज यांच्या वतीने दोन प्रतिनिधी राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यासाठी गुप्तपणे दिल्लीत दाखल झाले होते.

राज ठाकरे हे मुलगा अमितच्या लग्नाचं निमंत्रण मोजक्याच व्यक्तींना देणार आहेत. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

कोणत्या बड्या नेत्यांना दिलं निमंत्रण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, धनंजय मुंडे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, जयंत पाटील, मिलिंद देवरा, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या दिग्गज राजकीय नेत्यांना राज ठाकरेंनी अमितच्या लग्नाचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे.

उद्धव यांनाही निमंत्रण

अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले होते. राज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचित आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले होते. दोघा भावांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत होते. पण या भेटीचे राजकीय अर्थ काढू नका असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. राज यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा 27 जानेवारीला विवाह होणार आहे. त्यामुळे सध्या राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे मुलाच्या लगीनघाईमध्ये व्यस्त आहेत.

First published: January 14, 2019, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading