सोशल मीडियावरून राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली ताकीद, म्हणाले....

सोशल मीडियावरून राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली ताकीद, म्हणाले....

राज ठाकरे यांनी "इथं जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो...." असं म्हणून भाषणाला सुरुवात केली

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : नव्या वर्षात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचं मेकओव्हर करत धडाक्यात सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी मनसेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे.

मुंबईतील गोरेगावमध्ये मनसेचं महाअधिवेशन भरवण्यात आलं. यावेळी राज ठाकरे यांनी इथं "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो...." असं म्हणून भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या या वाक्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच टाळ्या वाजवून जयघोष केला.

त्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षशिस्तीवर बोट ठेवत कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघडणी केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक गोष्टी, नाराजी, किंवा तुमच्यातील वाद हे फेसबुक किंवा ट्वीटरवर पोस्ट केलेले चालणार नाही. अशी गोष्ट आढळल्यास मी त्या व्यक्तीला पदावरुन काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

तसंच यशाला बाप खूप असतात पण पराभवाला सल्लागारही खूप असतात. जो तो येऊन सल्ला देतोय. जरा वाईट दिवस आले की लोक सांगायला लागतात. आता नव्यानं पक्षबांधणीसाठी नवा सेल स्थापन करतोय. यासाठी दोन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे.  सुधीर राटसकर आणि वसंत फडके यांची त्यासाठी निवड केली आहे. ही लोकं तुम्हाला संपर्क साधतील, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.

तसंच  शॅडो कॅबिनेटची स्थापना करतोय हे सगळे सरकारच्या मंत्र्यावर लक्ष ठेवतील, असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

अमित ठाकरेंची राजकारणात एंट्री

दरम्यान, या अधिवेशनात राज ठाकरे यांचा सुपुत्र अमित ठाकरे राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांची  मनसेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. 14 वर्षांनंतर मनसेचा महाअधिवेशन मेळावा होत आहे. या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच अमित ठाकरेंवर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.

'27 वर्षांत पहिल्यांदाच मी जाहीर व्यासपीठावर बोलत आहे. तुम्ही सर्वांनी आज आणि याआधीही मला जे प्रेम दिलं आहे, ते भविष्यातही द्याल, यासाठी मी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो,' असं म्हणत अमित ठाकरे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. तसंच पहिल्याच कार्यक्रमात त्यांनी शिक्षण ठरावही मांडला आहे. अमित ठाकरे यांनी आज महाअधिवेशनामध्ये पहिल्यांदा ठराव मांडला आहे.  गुणवत्तेच्या शिक्षणासाठी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना होण्याची अवश्यकता आहे.

लहान मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी करण्याबाबत तातडीनं अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.  क्रीडा विद्यापीठ स्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग सुरू होणे गरजेचं असल्याचं सांगत अमित ठाकरे यांनी ठराव मांडला आहे.

First published: January 23, 2020, 7:38 PM IST

ताज्या बातम्या