...नाहीतर तलवारीला तलवारीने उत्तर देऊ - राज ठाकरे

...नाहीतर तलवारीला तलवारीने उत्तर देऊ - राज ठाकरे

कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंय'

  • Share this:

मुंबई, 09 फेब्रुवारी : एनआरसी आणि सीएए कायद्याला जाहीर पाठिंबा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागरिकत्त्व सुधारणा विधेयक कायद्याच्या विरोधात मोर्चे काढणाऱ्यांना धमकी दिली. 'आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. नीट एकोप्याने राहा नाहीतर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल, अशा इशाराच राज ठाकरेंनी दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत हिंदू जिमखाना ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या संख्येनं मनसेसैनिक या मोर्च्यात सहभागी झाले होते. आझाद मैदानावर या मोर्चाचं रुपांतर विराट सभेत झालं. यावेळी राज ठाकरे यांनी  बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना बाहेर हाकल्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका जाहीर केली.

NRC आणि CAA कायद्यावरून राज ठाकरे यांनी विरोधात मोर्चा काढणाऱ्यांना थेट धमकीच दिली आहे.  माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या वेळी केंद्राने चुकीचे निर्णय घेतले तेव्हा त्यांच्याविरोधात मीच बोललो होतो. आताही माझी भूमिका तीच आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

'आज हा मोर्चा काढून तुम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. नीट एकोप्याने राहा नाहीतर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल, उगाच ताकद दाखवायला भाग पाडू नका', असा इशाराच राज ठाकरेंनी दिला.

 

राज ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे

- २०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता.ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे.

- अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.

- सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.

- देशात अनेक बाॅम्ब ब्लास्ट झाले त्यामागे दाऊद इब्राहिम, त्याला पाकिस्ताननं सांभाळलं

- ज्यावेळी केंद्राचे चुकीचे निर्णय झाले त्यावेळी टीका केली,जेव्हा चांगली गोष्ट झाली तेव्हा अभिनंदनही केलं

- आज पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा,  लादेनही पाकिस्तानमधे सापडला

- कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंय.

- पाकिस्तानामध्ये जे हिंदू आहे त्यांच्यावर अत्याचार झाले

- अनेक प्रश्नांमधे बाहेरुन येणाऱ्या घुसखोरांचाही प्रश्न आहे

- माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली का

- मिरा-भाईंदरमधे नायजेरीयन लोक आलेत. तरीही सरकार ढिम्म!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 9, 2020 04:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading