राज ठाकरेंची टि्वटरवर एंट्री, तासाभरात हजारो फाॅलोअर्स

राज ठाकरे यांच्या नावाने @RajThackeray हे अकाऊंट सुरू करण्यात आले.

राज ठाकरे यांच्या नावाने @RajThackeray हे अकाऊंट सुरू करण्यात आले.

  • Share this:
मुंबई, 30 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकनंतर आता टि्वटरवरही एंट्री घेतलीये. सोशल मीडियावर राजकीय पक्षांची मांदियाळी पाहता हो  नाही म्हणत राज ठाकरे यांनी मागील वर्षी फेसबुक पेजच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधण्याचं ठरवलं आणि राज ठाकरे यांच्या नावे फेसबुक पेज सुरू करण्यात आले. या पेजवर त्यांचा सभा लाईव्ह दाखवल्या जातात. तसंच राज ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रही पोस्ट केली जातात. अल्वधीतच या पेजला तुफान प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या पेजवर सात लाख 84 हजार लाईक मिळाले आहे. आता टि्वटर सारख्या मायक्रो सोशल मीडियावरही राज ठाकरे यांच्या नावाने @RajThackeray हे अकाऊंट सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेलं टि्वटर अकाऊंट व्हेरिफाईड म्हणूनच सुरू झाले आहे. अद्याप राज ठाकरे यांनी कोणतेही टि्वट केले नाही पण हजारांच्यावर फाॅलोअर्सची भर पडली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मनसे अधिकृत या नावाने मनसेचं टि्वटर अकाऊंट आहे.
First published: