मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज ठाकरेंच्या भाषणाआधी उद्धव ठाकरेंबद्दल बाळा नांदगावकरांचा मोठा गौप्यस्फोट, 'मातोश्री'वरची चर्चा केली उघड

राज ठाकरेंच्या भाषणाआधी उद्धव ठाकरेंबद्दल बाळा नांदगावकरांचा मोठा गौप्यस्फोट, 'मातोश्री'वरची चर्चा केली उघड

बाळा नांदगावकरांचा मोठा गौप्यस्फोट

बाळा नांदगावकरांचा मोठा गौप्यस्फोट

राज ठाकरे यांच्या भाषणाआधी उद्धव ठाकरेंबद्दल बाळा नांदगावकरांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा होत असून राज ठाकरे आज शिवाजी पार्कवर सभेला संबोधित करणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी लक्षवेधीच असतो. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या भाषणाआधी उद्धव ठाकरेंबद्दल बाळा नांदगावकरांचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले बाळा नांदगावकर?

आज महाराष्ट्रातले बरेच विषय आहे, गेल्या 17 वर्षांचा प्रवास करत असताना मला अनेक प्रश्न पडले आहे. जर राज ठाकरे साहेबांनी जुन्या पक्षाची धुरा दिली असती तर या महाराष्ट्रात काय घडलं असतं, मला पूर्ण विश्वास आहे, राज ठाकरे हे पूर्ण अभ्यास करून बोलत नाही. दुर्दैवाने  त्यांना इतर लोक चालतात

बाळासाहेबांना जेलमध्ये भाषा करणारे चालतात, कोर्टात उभे करणारे चालतात. बाळासाहेबांना टी बाळू बोलणारे चालतात. छगन भुजबळ चालतात. टीपू सुलतानची तळी उचलणारे चालतात. टागर मेमनसाठी बोलणारे चालतात. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक चालतात. कोण बाळासाहेब ठाकरे? असं संभाजीनगरचे खासदार चालतात पण राज ठाकरे चालत नाही.

वाचा - राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री झालेलं आवडेल का? शर्मिला ठाकरे म्हणाल्या..

कारण राज ठाकरे हे स्वत: च्या भावना स्पष्टपणे बोलून दाखवतात. जे आहे ते आहे, एका बाजूला बाळासाहेबांनी वाटेल ते बोलणारी हिंदू देव दैवताचं अपमान कऱणारी ताईचालते आम्ही चालत नाही. काय केलं तुम्ही, मला आजही आठवत 2014 साठी भाजप आणि सेनेची युती तुटल्यानंतर तुम्ही मातोश्रीवरून फोन केला आणि आपण दोन भावंडांना एकत्र यायला पाहिजे. त्यामुळे साहेबांनी मला, शिरीश यांना बोलून घेतलं. त्यांचा फोन आला, आपण एकत्र यायला पाहिजे, असं सांगितलं. आम्ही तीन ते चार दिवस झोपलो नाही. पण, तुम्ही केलं काय भाजप आणि आमची युती होऊ नये म्हणून 27 तारखेला अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्म सुद्धा दिले नाही. हे कुणी फसवलं, का फसवलं ,कारण काय आहे, तुम्हाला काय भीती वाटते. राज ठाकरे स्वत: च्या शैलीने महाराष्ट्र बांधू शकतात.

First published:
top videos

    Tags: MNS, Raj Thackeray, Uddhav Thackeray