मी मराठी आणि हिंदू देखील आहे, मनसे अधिवेशनात राज ठाकरेंची गर्जना

मी मराठी आणि हिंदू देखील आहे, मनसे अधिवेशनात राज ठाकरेंची गर्जना

घुसखोरांच्या प्रश्नावर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं. घुसखोरांना हाकलण्यासाठी माझा केंद्र सरकार पाठिंबा आहे असंही ते म्हणाले.

  • Share this:

मुंबई 23 जानेवारी :  राज ठाकरे हे हिंदुत्वाची भूमिका घेणार, मनसे कात टाकत नव्या अवतारात येणार अशी चर्चा गेली काही दिवस होत होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष मनसेचे राज ठाकरेंच्या भाषणाकडे लागलं होतं. राज ठाकरे यांनी नेहमीच्या आपल्या आक्रमक शैलीत भाषण करत मनसेची नवी भूमिका जाहीर केली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......"  अशी केली. नेहमी ते माझ्या मराठी बंधू , भगिनी आणि मातांनो अशी करत असत. पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांचं शॅडो कॅबिनेट तयार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हे लोक सरकारवर नियंत्रण ठेवतील असंही ते म्हणाले. पक्षाचा झेंडा का बदलला याचा खुलासाही त्यांनी केला. घुसखोरांच्या प्रश्नावर मी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलं. घुसखोरांना हाकलण्यासाठी माझा केंद्र सरकार पाठिंबा आहे असंही ते म्हणाले.

राज ठाकरे काय म्हणाले?

मनसेची सुरुवात करताना जो झेंडा माझ्या मनात होता तोच हा झेंडा आहे असा खुलाला त्यांनी केली. गेली अनेक दिवस या झेंड्याची चर्चा सुरू होती. जेव्हा आम्ही मनसेच्या पंचरंगी झेंड्यांची चर्चा करत होतो तेव्हा खूप चर्चा झाली. त्यावेळी तो झेंडा आम्ही घेतला.

मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन.

मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवारांचं डोकं, भाजप नेत्याचा आरोप

जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही. पण सरसकट कोणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होते.

हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेंव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे. धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो जर त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही. आणि बांग्लादेशी मुस्लिमांना हाकलून द्या हे सांगणारा पण मीच होतो.

भाजपने केले उद्धव ठाकरे, पवार आणि राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

सीएए एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम ३७० असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे.

राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मत तीच आहे जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही.

राज ठाकरे म्हणाले, आपल्यातलेच अनेक जणं सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर ह्या सगळ्या माध्यमांचा वापर करून पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना आढळलं आहे, असले प्रकार ह्या पुढे मी खपवून घेणार नाही. आणि असे प्रकार आढळले तर त्यांची पदावरून गच्छन्ति अटळ आहे. असा इशारा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया

हा झेंडा आणावा हे माझ्या मनात गेले एक वर्ष घोळत होतं आणि माझा मूळचा डीएनए हाच आहे जो ह्या झेंड्याचा रंगाचा आहे. मग ठरवलं अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा समोर आणायचा. हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे. झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालंच होतं की असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 23, 2020 07:53 PM IST

ताज्या बातम्या