मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मनसेचा झेंडा का बदलला? राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

मनसेचा झेंडा का बदलला? राज ठाकरेंनी पहिल्यांदाच केला खुलासा

राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......"  अशी केली.

राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......" अशी केली.

राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......" अशी केली.

बई 23 जानेवारी :  राज ठाकरे हे हिंदुत्वाची भूमिका घेणार, मनसे कात टाकत नव्या अवतारात येणार अशी चर्चा गेली काही दिवस होत होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष मनसेचे राज ठाकरेंच्या भाषणाकडे लागलं होतं. राज ठाकरे यांनी नेहमीच्या आपल्या आक्रमक शैलीत भाषण करत मनसेची नवी भूमिका जाहीर केली. राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात "जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो......"  अशी केली. नेहमी ते माझ्या मराठी बंधू , भगिनी आणि मातांनो अशी करत असत. पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांचं शॅडो कॅबिनेट तयार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हे लोक सरकारवर नियंत्रण ठेवतील असंही ते म्हणाले. पक्षाचा झेंडा काय बदलला याचा खुलासाही त्यांनी केला.

मनसेची सुरुवात करताना जो झेंडा माझ्या मनात होता तोच हा झेंडा आहे असा खुलाला त्यांनी केली. गेली अनेक दिवस या झेंड्याची चर्चा सुरू होती. जेव्हा आम्ही मनसेच्या पंचरंगी झेंड्यांची चर्चा करत होतो तेव्हा खूप चर्चा झाली. त्यावेळी तो झेंडा आम्ही घेतला.

राज ठाकरे म्हणाले, आपल्यातलेच अनेक जणं सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर ह्या सगळ्या माध्यमांचा वापर करून पक्षातील अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना आढळलं आहे, असले प्रकार ह्या पुढे मी खपवून घेणार नाही. आणि असे प्रकार आढळले तर त्यांची पदावरून गच्छन्ति अटळ आहे. असा इशारा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया

हा झेंडा आणावा हे माझ्या मनात गेले एक वर्ष घोळत होतं आणि माझा मूळचा डीएनए हाच आहे जो ह्या झेंड्याचा रंगाचा आहे. मग ठरवलं अधिवेशनाच्या निमित्ताने हा झेंडा समोर आणायचा. हा सर्वसाधारण झेंडा नाही ह्यावर महाराजांची राजमुद्रा आहे त्यामुळे त्याचा सन्मान राखणं ही आपली जबाबदारी आहे. निवडणुकीच्या वेळेस राजमुद्रेचा झेंडा वापरायचा नाही, त्याचा आब राखला गेलाच पाहिजे. झेंडा बदलणं ही काही नवीन गोष्ट नाही, ह्या आधी जनसंघाने देखील झेंडा आणि नाव बदललंच आहे. १९८० साली जनसंघाचं नाव भारतीय जनता पक्ष झालंच होतं की असंही ते म्हणाले.

मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवारांचं डोकं, भाजप नेत्याचा आरोप

यशाला बाप खूप असतात आणि पराभवाला सल्लागार खूप असतात असंही त्यांनी सांगितलं.

आणि शर्मिला ठाकरे गहिवरल्या...

'मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा आज राजकारणात औपचारिक प्रवेश झाला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये सर्व ठाकरे कुटुंबीय उपस्थित होतं. अमित यांच्या रुपाने आणखी एका नव्या दमाच्या 'ठाकरें'चा राजकारण प्रवेश झाला आहे. गेली काही वर्ष अमित हे पक्षात सक्रिय होते. काही आंदोलनातही ते सहभागी होते. मात्र त्यांच्यावर औपचारिक जबाबदारी देण्यात आली नव्हती. या आधी गेली काही वर्ष आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत आणि सध्या ते राज्याचे पर्यटनमंत्रीही आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणुक न लढविण्याची आणि कुठलंही सरकारी पद न घेण्याची भूमिका घेतली होती.

VIDEO अमित ठाकरेंचा राजकारणात प्रवेश होताच आई शर्मिला आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी

नंतर मात्र राज आणि उद्धव ठाकरे यांनी नव्या पद्धतीने राजकारण केलं आणि आता ठाकरे घराण्याचा नवा सदस्य आपलं भविष्य आजमविणार आहे. गेले काही दिवस अमित यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती. अधिवेशनाच्या पहिल्या भागात माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरेंची नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला आणि त्याला सगळ्यांनी एका आवाजात पाठिंबा दिला.

अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार, असा होता प्रतिसाद

अमित यांच्या नावाची घोषणा होत असताना खाली कार्यकर्त्यांमध्ये अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी, बहिण उर्वशी आणि पत्नी मिताली या बसलेल्या होत्या. अमित यांच्या नावाची घोषणा झाली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी अमित यांच्या आई, आजी आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

अमितचं जेव्हा नाव ऐकलं तेव्हा अंगावर काटा उभा राहिला अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केली. तो लोकांसाठी काम करेल असंही त्या म्हणाल्या.

मनसेच्या नेतेपदी घोषणा झाल्यानंतर अमित यांनी पक्षाच्या वतीने शिक्षण विषयक ठराव मांडला. दप्तराचं ओझं कमी करणं, स्पर्धा परिक्षा देणाऱ्यांना ऑनलाईन अभ्यास साहित्य निर्माण करणं अशा अनेक सूचना त्यांनी केल्या.

First published:
top videos

    Tags: Raj Thackeray