मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अमित ठाकरेंचं वडिलांच्या पावलावर पाऊल, बाबासाहेबांचं रेखाटलं व्यंगचित्र!

अमित ठाकरेंचं वडिलांच्या पावलावर पाऊल, बाबासाहेबांचं रेखाटलं व्यंगचित्र!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती साजरी केली जात आहे. याच निमित्ताने अमित ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं एक सुंदर व्यंगचित्र रेखाटलं आहे.

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 14 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ज्या प्रकारे राजकीय फटकेबाजी करतात, तशीच फटकेबाजी ते आपल्या कुंचल्यातूनही साकारतात. राज्य ठाकरे यांनी रेखाटलेली  व्यंगचित्र आपण पाहिले असेलच. पण, त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांनीही आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. आज जगभरात भारतीय घटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती साजरी केली जात आहे. याच निमित्ताने अमित ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं एक सुंदर व्यंगचित्र रेखाटलं आहे. अमित यांनी एका पुस्तकातून बाबासाहेब यांचे व्यंगचित्र साकारले आहे. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना  'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा!' असा मूलमंत्र दिला होता. याचा धागा पकडून अमित यांनी बाबासाहेबांचं व्यंगचित्र साकारून अभिवादन केलं आहे. अमित यांनी हे व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडर यांना अभिवादन केलं आहे. अमित ठाकरे यांनी रेखाटलेल्या या व्यंगचित्राला फेसबुक युझर्संनी मोठी पसंती दिली आहे. अवघ्या काही तासांत बाबासाहेबांचं हे व्यंगचित्र मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलं आहे. हेही वाचा - मोदींनंतर राज ठाकरेंची जनतेला कळकळीचीं विनंती, काय म्हणाले मनसे प्रमुख? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून राज ठाकरे व्यंगचित्राचे धडे गिरवले होते. राज ठाकरे यांचा व्यंगचित्र रेखाटण्यामध्ये चांगलाच हातखंडा आहे. त्यांच्या पावलावर आता अमित ठाकरे यांनी पाऊल ठेवले आहे. याआधीही अमित यांनी व्यंगचित्र रेखाटली होती. याच वर्षी जानेवारी महिन्यात अमित ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात पाऊल टाकले आहे. त्यांच्यावर पक्षात नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अमित हे वेगवेगळ्या आंदोलनातून, विषयातून आपला सहभाग नोंदवत आहे. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: MNS, Raj Thackery

पुढील बातम्या