मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Raj Thackeray Rally : ...तर तिकडेच गणपती मंदिर बांधू, मुंबईतली अनधिकृत मजार दाखवत राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray Rally : ...तर तिकडेच गणपती मंदिर बांधू, मुंबईतली अनधिकृत मजार दाखवत राज ठाकरेंचा इशारा

मुंबईच्या समुद्रात अनधिकृत मजार, राज ठाकरेंचा इशारा

मुंबईच्या समुद्रात अनधिकृत मजार, राज ठाकरेंचा इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहीम समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये अनधिकृत मजार बांधली गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ दाखवला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या माहीम समुद्र किनाऱ्याच्या आतमध्ये अनधिकृत मजार बांधली गेल्याचा धक्कादायक व्हिडिओ दाखवला आहे. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी हा व्हिडिओ दाखवत इशारा दिला आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. जे होईल ते होईल, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे इथं असलेल्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेचे लोक फिरतात, पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजी अली तयार करणार, आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग  काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेकडे आता शिवसेना हे नाव आलं, जो विचार बाळासाहेबांचा विचार आहे. माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या. एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरचे भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरचे भोंगे आम्ही उतरवून दाखवू, असा इशारा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दिला आहे.

First published:
top videos