Elec-widget

EDच्या नोटीसवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना दिला हा आदेश

EDच्या नोटीसवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना दिला हा आदेश

'सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.'

  • Share this:

मुंबई 20 ऑगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना EDने दिलेल्या नोटीसवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. एक प्रसिद्धी पत्रक काढून त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांना काही आदेशही दिले आहेत. राज यांना नोटीस मिळाल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काहींनी बंदची हाक दिली होती तर महाराष्ट्रभरातल्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्यात आवाहनही करण्यात आलं होतं. मात्र खुद्द राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिलाय. 22 तारखेला मुंबईत येवू नका आणि सार्वजनीक मालमत्तेची नासधूस करू नका असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. कुणी डिवचण्याचा प्रयत्न केला तरीही शांतच राहा असं आवाहनही त्यांनी केलंय.

राज ठाकरेंचं आवाहन...

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना, सस्नेह जय महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वानी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटीसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू.

राष्ट्रवादीला मोठा धक्का? छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर, मुंबईत तातडीने बोलावले

Loading...

इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वाना विनंती आहे की येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा.

सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचयचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत रहा.

तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये.

आणि बाकी ह्या विषयावर मला जे बोलायचं आहे ते मी योग्य वेळी बोलेनच.

VIDEO: वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीवर काय म्हणाले खासदार इम्तियाज जलील?

दादरच्या मोक्याच्या ठिकानी असणाऱ्या कोहिनूर मिलच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने ही चौकशी करण्यात येत आहे. राज ठाकरेंच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर 22 तारखेला फोर्ट परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून अनेक रस्ते बंद करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

...तर मारलंच असतं, ठाणे महापौराच्या पदाधिकाऱ्याची मराठा कार्यकर्त्यांना धमकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 02:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...