ठाण्यात राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा, इथं होणार सभा

ठाण्यात राज ठाकरेंच्या सभेचा मार्ग मोकळा, इथं होणार सभा

१८ तारखेला ठाण्यात होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभेची जागा अखेर निश्चित झाली आहे.

  • Share this:

14 नोव्हेंबर : १८ तारखेला ठाण्यात होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभेची जागा अखेर निश्चित झाली आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन मार्गावर ही सभा होणार आहे.

फेरीवाल्यांच्या आंदोलनानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेची घोषणा केली. ठाण्यात ही सभा होणार होती. ठाण्यातील रेल्वे स्थानक परिसरात या सभेची तयारी मनसेकडून करण्यात येत होती. पण पोलिसांनी या ठिकाणी सभेला परवानगी नाकारली होती.

त्यानंतर आज  ठाणे वाहतूक शाखा आणि ठाणे पोलिसांसोबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नव्या जागेची पाहणी केली. त्यानंतर ही सभा आता गडकरी रंगायतन मार्गावर होणार आहे.  नागरिकांच्या अडचणींचा विचार केल्याने सभेचे ठिकाण बदलले असल्याची माहिती ठाणे मनसे संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांनी दिली. त्यामुळे येत्या 18 तारखेला राज ठाकरेंची सभा होणार हे आता निश्चित झालंय.

First published: November 14, 2017, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading