News18 Lokmat

राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या? निवडणुकीबाबत म्हणतात...

कारण गेल्या काही दिवसांपासून मनसे राष्ट्रवादीशी जवळीक साधत होते. मात्र पवारांनी मनसेसोबत आघाडीची शक्यता नाकारली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 03:01 PM IST

राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या? निवडणुकीबाबत म्हणतात...

अक्षय कुडकेलवार,मुंबई, 11 फेब्रुवारी : शरद पवारांच्या मनसेबाबतच्या नव्या विधानाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे पेचात सापडले आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून मनसे राष्ट्रवादीशी जवळीक साधत होते. मात्र पवारांनी मनसेसोबत आघाडीची शक्यता नाकारली आहे.

'लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. निर्णय झाला की स्वत: जाहीर करणार आहे,' अशी सावध भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मनसेची कृष्णकुंजवर बैठक

लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखी पुढील रणनीती आखण्यासाठी कृष्णकुंज या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे लोकसभेच्या किती जागा लढवायच्या, याबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे ही राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याची चर्चा होती. पण नुकतंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे आमच्यासोबत येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आता मनसेच्या गोट्यातील हालचालींना वेग आला आहे.

Loading...

तीन जागा लढवणार?

राज ठाकरेंचा मनसे हा पक्ष लोकसभा निवडणुकीत तीन जागांवर लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या तीन जागा नक्की कोणत्या आहेत, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु यामध्ये मुंबई आणि नाशिकच्या जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीसोबत मैत्रीपूर्ण लढत?

मनसे आणि राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीत उघड आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. कारण या आघाडीला काँग्रेसचा विरोध आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये अंतर्गत समझोता होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राष्ट्रवादीकडून मनसेचा उमेदवार असलेल्या ठिकाणी कमकुवत उमेदवार देऊन मनसेला अप्रत्यक्ष मदत केली जाऊ शकते.


VIDEO : 'एकट्याने काम होत नाही, सामुहिक कार्याची गरज' ; गडकरींचा पुन्हा धमाकाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 03:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...