विवेक कुलकर्णी, मुंबई
18 जुलै : २०१२ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रझा अकादमीविरुद्ध काढलेल्या मोर्चासंदर्भात डी बी मार्ग पोलीस स्टेशनने दाखल केलेली केस आणि एफआयआर दोन्हीही मुंबई हायकोर्टाने रद्दबातल केल्या आहेत.
राज ठाकरे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानादेखील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान येथे मोर्चा काढला होता. त्याविरोधात डी बी मार्ग पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. या संदर्भातले आरोपपत्र सहा महिन्यात दाखल होणं हे कायद्याच्या दृष्टीनं अपेक्षित असताना २०१२ तील ही केस असताना २०१४ आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
हाच तांत्रिक मुद्दा घेत पक्षाचे नेते शिरीष सावंत केस आणि एफआयआर रद्द करण्यात यावा अशी रीट याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. राजेंद्र शिरोडकर आणि आर्चित साखळकर यांनी यावेळी पक्षातर्फे बाजू मांडली. यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरत कोर्टाने केस आणि एफआयआर रद्द केला आहे.