मुंबई, 22 मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्याला शिवाजी पार्कवर सुरूवात झाली आहे. थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात होणार आहे, त्याआधी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे सभेच्या ठिकाणी दाखल झाले. अमित ठाकरे सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी केलेल्या एका कृतीमुळे कार्यकर्त्यांचं मन जिंकलं.
सभेसाठी आल्यानंतर अमित ठाकरे मनसेच्या व्यासपीठावर न बसता खाली जाऊन बसले. यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरे यांना व्यासपीठावर येऊन बसण्याची विनंती केली. अमित ठाकरे व्यासपीठ सोडून खाली बसले. तुम्ही आमचे नेते आहात, व्यासपीठावर येऊन बसा. तुमचा हा नम्र पणा जर इतर लोकांनी घेतला तर बरंच काही होईल, असं बाळा नांदगावकर म्हणाले. बाळा नांदगावकर यांच्या विनंतीला मान देऊन अमित ठाकरे मग व्यासपीठावर बसायला गेले.
काय म्हणाले बाळा नांदगावकर?
आज महाराष्ट्रातले बरेच विषय आहे, गेल्या 17 वर्षांचा प्रवास करत असताना मला अनेक प्रश्न पडले आहे. जर राज ठाकरे साहेबांनी जुन्या पक्षाची धुरा दिली असती तर या महाराष्ट्रात काय घडलं असतं? असा सवाल बाळा नांदगावकर यांनी विचारला आहे.
बाळासाहेबांना जेलमध्ये भाषा करणारे चालतात, कोर्टात उभे करणारे चालतात. बाळासाहेबांना टी बाळू बोलणारे चालतात. छगन भुजबळ चालतात. टीपू सुलतानची तळी उचलणारे चालतात. टायगर मेमनसाठी बोलणारे चालतात. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक चालतात. कोण बाळासाहेब ठाकरे? असं संभाजीनगरचे खासदार चालतात पण राज ठाकरे चालत नाही, अशी खंतही बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली.
कारण राज ठाकरे हे स्वत: च्या भावना स्पष्टपणे बोलून दाखवतात. जे आहे ते आहे, एका बाजूला बाळासाहेबांना वाटेल ते बोलणारी हिंदू देव दैवताचं अपमान कऱणारी ताई चालते आम्ही चालत नाही. काय केलं तुम्ही? संजय राऊतांना तुम्ही मोठ केलं आहे. तो संजय राऊत त्यांचा झाला नाही, तो तुमचा काय होणार आहे. त्याने कबुली दिली तो शरद पवारांचा माणूस आहे. त्यांनी जर कबुली दिली असेल तर काय करायचं? तरी सुद्धा 2017 ला मी मातोश्रीला आलो होतो. त्यावेळी मीच प्रपोजल दिलं होत, दोन्ही भावांनी एकत्र आलं पाहिजे. पण तुम्हीच मला म्हणाला शिवसेनेत ये, त्यावेळी बैठकीत सुभाष देसाई, अनिल परब, राहुल शेवाळे होते, मला प्रश्न पडला. दोन्ही भाऊ एकत्र आले तर तुम्ही मोठे भाऊ आम्ही लहान भाऊ होऊ. पण, असं विधान बाळा नांदगावकर यांनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray