Home /News /mumbai /

जेम्स बाँडची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्याला राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

जेम्स बाँडची भूमिका अजरामर करणाऱ्या अभिनेत्याला राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

पडद्यावर 007 या ब्रिटीश एजंटाची भूमिका वठवणारा आणि सुंदर ललनांना लीलया खेळवणारा जेम्स बाँड खऱ्या अर्थाने शॉन कॉनेरी यांनी उभा केला.

    मुंबई, 1 नोव्हेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे जेम्स बाँडच्या चित्रपटांचे चाहते आहेत. ठाकरे यांना जेम्स बाँडचे चित्रपट खूप पसंत आहेत. शॉन कॉनेरी यांच्या निधनानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या पोस्टमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हॉलिवूड अभिनेता दिग्गज शॉन कॉनेरी यांच शनिवारी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये राज ठाकरेनेही कॉनेरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी एक नोटही लिहिली आहे. या नोटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, जेम्स बाँडचं नाव घेतल्यानंतर शॉन कॉनेरी यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी लिहिलं आहे की, जर गॉडफादर चित्रपटाबद्दल विचार केला तर मार्लन ब्रँडो यांचा चेहरा दिसतो. त्याचप्रमाणे जेम्स बाँडचं नाव घेता शॉन कॉनेरी यांची आठवण येते. कोल्ड वॉरच्या वेळी इयान फ्लेमिंग यांनी आपल्या पुस्तकात जेम्स बाँड यांची भूमिका उभी केली होती, पुस्तकांच्या जगाबाहेर पडद्यावर जर कोणी ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवली तर ती शॉन कॉनेरी यांनी. ते आमच्या ह्रदयात आहेत. दिग्गज हॉलिवूड अभिनेता जगातला सर्वात लोकप्रिय अभिनेता असं बिरूद मिळवलेला हा sexiest man on earth एके काळी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झोपडपट्टीसारख्या वस्तीत राहायचा, हे सांगून खरं वाटणार नाही. बाँड जिवंत करणारे सर शॉन कॉनेरी यांचं 90 व्या वर्षी निधन झालं. राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, कॉनेरी यांनी सहा चित्रपटात जेम्स बाँडची भूमिका साकारली होती. त्यांनी अनोख्या शैलीत साकारलेल्या या भूमिकेने आमच्या मनात जागा केली आहे. त्यांचा वारसा इतर कलाकारांसाठी आदर्श केला आहे, जो इतर कलाकार स्वीकारत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Raj thacarey

    पुढील बातम्या