S M L

मुनगंटीवारांना जंगलातलं सगळं कळतंच असं नाही-राज ठाकरे

"वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं"

Updated On: Nov 7, 2018 04:58 PM IST

मुनगंटीवारांना जंगलातलं सगळं कळतंच असं नाही-राज ठाकरे

मुंबई,07 नोव्हेंबर :  अवनी वाघिणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा फड रंगलाय. या आरोपांच्या गदारोळात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे.  वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत फक्त पुतळे उभारुन वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही असा टोलाही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला लगावला.


सुधीर मुनगंटीवार हे आता वनमंत्री झाले आहे. ते वनमंत्री आहे म्हणून त्यांना जंगलातलं सगळंच कळतं असं नाही. ते काही आतापर्यंत जंगलावर रिसर्च करत नव्हते. आज वनमंत्री आहे उद्या नसतील असा टोला राज ठाकरे यांनी मुनगंटीवारांना लगावला.तसंच भाजप सरकारला सत्तेवरून खाली उतरवल्याशिवाय त्यांना हे समजणार नाही अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.


Loading...

मुख्यमंत्र्यांकडून मुनगंटीवारांची पाठराखण


तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी अवनीच्या हत्येवरून राज्य सरकारवर टीका केली होती. तसंच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर चौफेर टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मदतीला धावून आले. सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे. ते स्वतः बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते,’ असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली.


 


...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार


गेल्या अनेक दिवसांपासून अवनी वाघिणीचा शोध घेतला जात होता. परवा एका गावकऱ्याने टी-१ वाघीण दिसल्याची माहिती दिली आणि शोध मोहीम सुरू झाली. ट्रॅक्युलाझ केल्यानंतर वाघीण लगेच गुंगीत जात नाही कारण डोस कमी द्यावा लागतो. अशात वाघिणीने जिप्सीवर हल्ला केला आणि नाईलाजाने तिला ठार करावं लागलं असं मुनगंटीवार म्हणाले.


वन विभागाने अतिशय संवेदनशीलतेने हे प्रकरण सांभाळलं. मुळात वन कर्मचारी हे वन्य प्राण्यांचे शत्रू असू शकत नाही. वन आणि वन प्राण्यांचे संरक्षण करण्याचं सर्वात मोठं काम आमच्या सरकारने केले आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना वाघांच्या संवर्धनाचे ब्रँड अॅम्बेसेडर करणारं हे राज्य आहे असंही मुनगंटीवार म्हणाले.


---------------------------------------------------------------------


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2018 04:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close