भाजपच्या दानवाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा नाहीत -राज ठाकरे

शेतकऱ्यांना अपेक्षा मानवाकडून आहेत, भाजपच्या दानवाकडून नाहीत अशी टीका राज ठाकरेंनी केली.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 11, 2017 10:03 PM IST

भाजपच्या दानवाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा नाहीत -राज ठाकरे

11 मे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त विधानावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना अपेक्षा मानवाकडून आहेत, भाजपच्या दानवाकडून नाहीत अशी टीका राज ठाकरेंनी केली.

राज्य सरकारने एवढी तूर खरेदी करून सुद्धा रडतात साXX अशा असंसदीय भाषेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांवरच टीका केली होती. दानवेंच्या या विधानानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. विरोधकांनी ठिकठिकाणी रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्यांचं दहन करून निषेध व्यक्त केला.

मनसेचे अध्य़क्ष राज ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करत त्यांची तुलना दानवाशी केलीये.  राज्यातल्या शेतकऱ्यांना अपेक्षा मानवाकडून आहेत, भाजपच्या दानवाकडून नाहीत अशी टीका राज ठाकरेंनी केली.  मनसेच्या अधिकृत टि्वटरवर हँडलद्वारे राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 11, 2017 10:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...