मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राज यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले...

राज यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले...

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा समाचार मी गुढीपाडव्याच्या सभेत घेईन, असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय.

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा समाचार मी गुढीपाडव्याच्या सभेत घेईन, असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय.

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा समाचार मी गुढीपाडव्याच्या सभेत घेईन, असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय.

 

मुंबई, 23 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाला नवीन दिशा देण्यासाठी महाअधिवेशन घेतलं. यावेळी 'मी रंग बदलून सरकारमध्ये जात नाही', असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता निशाणा साधला.

मुंबईतील गोरेगावमध्ये मनसेचं महाअधिवेशन पार पडलं. यावेळी राज ठाकरे यांनी "इथं जमलेल्या माझ्या तमाम 'हिंदू' बांधवानो, भगिनींनो आणि मातांनो...." असं म्हणून भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या या वाक्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच टाळ्या वाजवून जयघोष केला. त्यानंतर पक्षाचा झेंडा का बदलला याबद्दल खुलासा करत असता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख न करत टोला लगावला.

'नरेंद्र मोदींची जी गोष्ट चुकीची त्यावर मी टीका केली, जी गोष्ट योग्य आहे त्याचे अभिनंदन आहे. कलम ३७० हटवले त्यावेळी मी अभिनंदन केले, अयोध्येचा निकाल आला त्यावेळी मी प्रतिक्रिया दिली होती. एनआरसी आणि सीएए वर एखाद्यावेळी चर्चा होईल. मात्र, बाहेरुन आलेल्यांना का पोसायचे? सीएए विरोधात निघणारे मोर्चे हे कलम ३७० चा राग आहे, अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराचा राग आहे.

त्यामध्ये सहभागी होणारे मुसलमान हे बाहेरचे आहे, जर त्यांना इथले मुसलमान समर्थन करत असतील तर त्यांचे काय करायचे ? मी रंग बदलला म्हणून बोलत नाही ही माझी पूर्वीपासूनच भूमिका आहे. रंगबदलून मी सरकारमध्ये जात नाही', असं म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

'मी मराठी आणि हिंदू देखील आहे'

मनसेची सुरुवात करताना जो झेंडा माझ्या मनात होता तोच हा झेंडा आहे असा खुलासा त्यांनी केली. गेली अनेक दिवस या झेंड्याची चर्चा सुरू होती. जेव्हा आम्ही मनसेच्या पंचरंगी झेंड्यांची चर्चा करत होतो तेव्हा खूप चर्चा झाली. त्यावेळी तो झेंडा आम्ही घेतला.

मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन.

राज ठाकरे 9 फेब्रुवारीला काढणार मोर्चा

नसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरेंनी मनसेचा झेंडा का बदलला, आपली हिंदुत्वाबद्दलची भूमिका काय हे स्पष्ट केलं. असं असलं तरी त्यांच्या या भाषणाचा मुख्य रोख मोदी सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्यावर होता. पाकिस्तान आणि बांग्लादेशातून भारतात आलेल्या मुस्लिमांच्या विरोधात मनसे भव्य मोर्चा काढणार आहे, असं त्यांनी जाहीर केलं. मनसे 9 फेब्रुवारीला हा मोर्चा काढणार आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या मुस्लिमांना परत पाठवा, ही आमची मागणी असेल, असंही राज ठाकरे म्हणाले. त्यांनी घुसखोरांना 'चले जाव' चा इशारा दिला आहे.

अमित शहा, उद्धवना भेटणार

जे मुसलमान देशाशी प्रामाणिक आहेत ते आमचेच आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. पण सुधारित नागरिकत्व कायद्याच्या बाजूने त्यांनी उघडपणे भूमिका घेतली आणि मोदी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबाच दिला. बेकायदेशीर नागरिकांच्या विरोधात त्यांनी थेट भूमिका घेतली. माझ्याकडची घुसखोरांबदद्लची माहिती घेऊन मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. इतर देशांप्रमाणेच भारतालाही बेकायदेशीररित्या इथे राहणाऱ्यांच्या विरोधात कडक भूमिका घ्यावी लागेल, असं राज ठाकरे म्हणाले.

गुढीपाडव्याला समाचार

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा समाचार मी गुढीपाडव्याच्या सभेत घेईन, असं राज ठाकरेंनी जाहीर केलंय. पण त्याआधी 9 फेब्रुवारीला भव्य मोर्चा काढण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आणि भाषणाचा शेवट केला. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलनं सुरू आहेत. राम मंदिर आणि कलम 370 बद्दल मोर्चे काढता आले नाहीत त्याचा राग मुस्लीमधर्मीय या आंदोलनातून काढतायत. या स्थितीत आम्ही इथल्या नागरिकांनाच साथ द्यायला हवी, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना दिली ताकीद

राज ठाकरे यांनी पक्षशिस्तीवर बोट ठेवत कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक गोष्टी, नाराजी, किंवा तुमच्यातील वाद हे फेसबुक किंवा ट्वीटरवर पोस्ट केलेले चालणार नाही.

अशी गोष्ट आढळल्यास मी त्या व्यक्तीला पदावरुन काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच राज ठाकरेंनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

तसंच यशाला बाप खूप असतात पण पराभवाला सल्लागार खूप असतात. जो तो येऊन सल्ला देतोय. जरा वाईट दिवस आले की लोक सांगायला लागतात. नव्यानं पक्षबांधणीसाठी नवा सेल स्थापन करतोय. यासाठी दोन पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. सुधीर राटसकर आणि वसंत फडके यांची निवड केली आहे. ही लोकं तुम्हाला संपर्क साधतील, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली.

First published:
top videos