S M L

राज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'

आज राज ठाकरे ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.

Updated On: Aug 14, 2018 03:14 PM IST

राज ठाकरे म्हणतात, 'दादा, मनाला लावून घेऊ नका'

ठाणे, 14 आॅगस्ट : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील तुतुमैंमैं सर्वश्रूत आहे. रविवारी पुण्यात झालेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आहे. यावेळी जर गेल्या 60 वर्षात सिंचनाचा पैसा मुरला नसता तर राज्याची पाणी पातळी कमी झाली नसती असं वक्तव्य करून अजित पवारांना टोला लगावला होता. आता टोला परतवून लावणार नाही ते अजित पवार कुठले..पण आज राज ठाकरे यांनी दादा, मनाला लावून घेऊ नका असं सांगत मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय.

पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली. 1960 ला संयुक्त महाराष्ट्र झाला. इथं दोन्ही पक्षांचे नेते आहेत. जर गेल्या 60 वर्षात सिंचनाचा पैसा मुरला नसता तर राज्याची पाणी पातळी कमी झाली नसती. यावेळी लोकांनी राज ठाकरे यांनी श्रमदानाला यावं अशी मागणी केली. त्यावरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. मी श्रमदानाला नक्की येईल. मला कुदळ कशी मारायची ते माहित आहे. मात्र फावडं कसं मारायचं ते शिकवाल असं राज यांनी म्हणताच लोकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला.

राज ठाकरे यांच्या फटकेबाजीनंतर अजित पवारांनी चांगलीच टोलेबाजी केली. आपल्याकडे काही जण बोलघेवडे असतात. त्यांना काहीच करायचं नसतं. ते येतात आणि बोलून निघून जातात असा सणसणीत टोला अजित पवारांनी लगावला होता.

आज राज ठाकरे ठाण्याचे नवीन पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी  मी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात अजित पवारांना उद्देशून बोललो नाही.  मी जे बोललो ते १९६० पासून सुरू आहे, त्यावर फक्त भाष्य केलं होतं.  अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं हे मला माहिती नाही. पण मनाला लावून घेऊ नका असं राज ठाकरे म्हणाले.

तसंच पाणी फाऊंडेशनला मला जेव्हा मी बसलो होतो तेव्हा माझ्या उजव्या बाजूने जो आवाज आला की आमीर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यातून चांगली कामे केलीयेत हे मला अशोक चव्हाण बोलले.  जर लोक सहभागातून कामं होणार असतील तर मग सरकार काय करतंय.  १ लाख २० हजार विहिरीत बांधल्या या काय लोकसहभागातून बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करतात असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला. सरकारी अधिकारी आमिर खान साठी काम करतायेत का?, असा संशय उपस्थितीत करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश आमिर खानच्या आड लपवू नये असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

Loading...
Loading...

 थापा मारायच्या तरी किती ?

जर संस्था कामं करत असतील तर करदात्यांनी कर का भरायचा ?, १ लाख २० हजार विहिरी मुख्यमंत्री का दाखवू शकत नाही. हगनदारी मुक्त महाराष्ट्रात १ लाख २० हजार विहिरी बांधल्या थापा मारायच्या तरी किती ?, अनेक जुन्या विहिरी पेपरमध्ये दाखवल्या जातायेत. सरकार आपली जबाबदारी का झटकतंय ? असा सवालही त्यांनी केला.

'भाजपला पराभव दिसतो म्हणून एकत्र निवडणुकाचा डाव'

११ राज्याच्या आणि लोकसभा एकत्र निवडणुका घेण्याचे खुळ का आलंय सरकारच्या डोक्यात हे कळत नाही. मुळात  भाजप आता निवडून येणार नाही याची भीती मोदींना आहे. त्यामुळे एकत्र निवडणूक घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे, मुळात भाजपला आतून कळालंय की ते हरलेत म्हणून हे करतात. असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

 

संबंधीत बातम्या

जलसंधारणासोबतच मनसंधारणही करायचं आहे - अमिर खान

वॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडीनं मारली बाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 03:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close