टीडीपीवरून राज ठाकरेंच्या कुंचल्यातून शिवसेनेला पुन्हा 'फटकारे'

टीडीपीवरून राज ठाकरेंच्या कुंचल्यातून शिवसेनेला पुन्हा 'फटकारे'

दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमकीची खिल्ली उडवली आहे.

  • Share this:

08 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुचल्यांचे फटकारे मारत शिवसेनेला डिवचले आहे. आपल्या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या 'सत्तेतून बाहेर पडू' या घोषणेची खिल्ली उडवलीये.

आंध्र प्रदेश राज्याला विशेष दर्जा मिळण्याबाबत होत असलेली चालढकल पाहून तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 'एनडीए'मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याचाच आधार घेत राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात चंद्राबाबू नायडू यांच्या हातात बॅग आणि दुसऱ्या हातात एक गाठोड घेऊन घराबाहेर पडताना दाखवलं आहे.

"स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान" अशी टॅग लाईन देण्यात आलीये. तसंच "हॅSS यात कसला 'मर्द'पणा ?, त्यांना म्हणावं हिम्मत असेल तर सरकारमध्ये राहून अपमान गिळून वर, सरकारला धमक्या देऊन दाखवा" असा खोचक टोलाही राज यांनी लगावला.

तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमकीची खिल्ली उडवली आहे.

First published: March 8, 2018, 10:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading