News18 Lokmat

जलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात

. राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या नव्या व्यंगचित्रातून फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवर आसूड ओढलाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2018 08:08 PM IST

जलयुक्त 'शिव्या'र, राज ठाकरेंच्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर घणाघात

15, आॅक्टोबर, मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय. राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या नव्या व्यंगचित्रातून फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेवर आसूड ओढलाय.

फडणवीस सरकारने एक लाख पंचवीस हजार विहिरी बाधल्या असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपल्या अनेक भाषणातून याचा उल्लेख केलाय. याचाच धागा पकडून राज ठाकरे यांनी जलयुक्त शिवार योजना की जलयूक्त 'शिव्या'र योजना अशी खिल्ली उडावलीये.

संतापलेला आणि तहानलेला महाराष्ट्र फडणवीस सरकाराला शिव्या देतोय असं या व्यंग्यचित्रातून भासवण्यात आलंय.

विहिरीत संतापलेला आणि तहानलेला महाराष्ट्रातील जनतेत शेतकरी आणि पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिला दाखवण्यात आलीये. विहिरीच्या वरच्या भागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार दिसत आहे.

Loading...

याआधीही ८ आॅक्टोबर रोजी राज ठाकरेंनी फडणवीस सरकारवर व्यंगचित्र रेखाटलेले होते. 'मुख्यमंत्र्यांचा वैचारिक दुष्काळ' या आशयाने हे व्यंगचित्र रेखाटले होते. मुख्यमंत्र्यांनी पुढचा मुख्यमंत्री मीच होणार असं वक्तव्य केलं होतं त्यावर राज ठाकरे यांनी हे व्यंगचित्र रेखाटले होते.

====================================================

राज ठाकरेंनी रेखाटलेली व्यंगचित्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 15, 2018 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...