S M L

'जागा' दाखवली, राज ठाकरेंचे पुन्हा मोदींना 'फटकारे'

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे

News18 Lokmat | Updated On: Jan 8, 2019 10:18 PM IST

'जागा' दाखवली, राज ठाकरेंचे पुन्हा मोदींना 'फटकारे'


मुंबई, 08 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा मोदी सरकारला फटकारले आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यावरून, 'कोर्टाने सरकारला जागा दाखवली', असा टोला राज यांनी लगावला.सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने केंद्र सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. कारण, आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाचं सरकारकडून समर्थन करण्यात आलं होतं. त्यावरून राज ठाकरे यांनी आज नवे व्यंगचित्र रेखाटले आहे.

या व्यंगचित्रामध्ये न्यायमूर्ती हे आलोक वर्मा यांना या बस्सा म्हणून सांगताय, असं दाखवण्यात आलं आहे. तर नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या कटघऱ्यात दाखवण्यात आलं आहे.

याआधीही 2019 च्या पहिल्याच दिवशी राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रामधून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. मतदारांना उद्देशून असलेल्या नव्या व्यंगचित्रात मतदारांनी खूप सोसलं ते आता पुन्हा तीच चूक करणार नाही असं म्हटलं होतं.

Loading...

===========


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 10:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close