S M L

राज ठाकरेंच्या कुंचल्यातून पुन्हा मोदी-शहांना 'फटकारे'

"आम्ही आजवरच्या प्रगतीबद्दल आत्तापर्यंतच्या सर्व श्रेय दिलं पण तेवढा उदारपणा तुम्ही दाखवला का ?" या मोदी यांच्या वक्तव्यावरुन राज यांनी हे व्यंगचित्र काढलं आहे.

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2018 10:09 PM IST

राज ठाकरेंच्या कुंचल्यातून पुन्हा मोदी-शहांना 'फटकारे'

12 फेब्रुवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना व्यंगचित्राच्या मार्फत फटकारून काढलं आहे.

या नव्या व्यंगचित्रात मोदी सरकारच्या योजना म्हणजे जाहीरातबाजीचा पेंढा भरलेलं बुजगावणं दाखवत त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या तोंडी हे खिल्ली उडवलेलं वाक्य आहे. या व्यंगचित्रात मोदींच्या मागे अमित शहा दाखवण्यात आले आहेत आणि त्यांच्याकडे असलेल्या पिशवीवर 'जुमला' असं लिहिण्यात आलं आहे.

"आम्ही आजवरच्या प्रगतीबद्दल आत्तापर्यंतच्या सर्व श्रेय दिलं पण तेवढा उदारपणा तुम्ही दाखवला का ?" या मोदी यांच्या वक्तव्यावरुन राज यांनी हे व्यंगचित्र काढलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 10:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close