News18 Lokmat

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2019 12:26 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला

मुंबई, 20 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेही उपस्थित आहेत, अशी माहिती आहे.

राज ठाकरेंनी आधीही घेतली होती अजित पवारांची भेट

'आपल्याला लोकसभा निवडणूक लढवायची नाही हे मी आधीच जाहीर केलं होतं. तरीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न झाले. त्यामुळे मी अजित पवारांना फोन केला होता आणि त्यांची भेट घेतली होती. या भेटीत मी त्यांना जागावाटपाबद्दल थेट विचारलं होतं. ते होत नाही तेच अशोक चव्हाण यांचाही फोन आला होता. त्यांनाही जागावाटपाबाबत आम्ही काही बोललो का असा सवाल केला होता. पण आमची कोणतीही भूमिका नसताना त्यांच्याकडून वेगवेगळी विधान कऱण्यात आली', असा खुलासा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला. तसंच ही लोकसभा कोणत्या पक्षाविरोधात नाहीतर मोदी-शहा या जोडी विरोधात आहे, त्यामुळे यापुढील प्रत्येक सभा ही मोदी-शहांविरोधात राहणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.


VIDEO : नागपूरात 20 बसची तोडफोड, पुण्यात 3 शिवशाही बस जळून खाक

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 20, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...