'राज ठाकरेंनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरावं हीच कार्यकर्त्यांची इच्छा'

'राज ठाकरेंनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरावं हीच कार्यकर्त्यांची इच्छा'

'मनसे'ला निवडणूक लढवायला काही अडचण आहे असं वाटत नाही मात्र अंतिम निर्णय राज साहेब घेतील.'

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, मुंबई 20 सप्टेंबर : नाही, नाही म्हणता मनसेने आता विधानसभा निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. मनसेच्या काही नेत्यांनी आज विभागाध्यक्षांची मतं ऐकून घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली. मनसेने विधानसभेच्या आखाड्यात उतरून निवडणुका लढवाव्यात ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि राज राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या मताचा आदर करतील असंही ते म्हणाले. यावून मनसे निवडणुका लढण्याचा विचार करत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

नांदगावकर म्हणाले, गेल्या वेळी राज ठाकरे यांनी आमची मतं जाणून घेतली. आज आम्हाला विभाग अध्यक्षांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या सुचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. आज सगळ्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. त्याबाबतचा अहवाल आम्ही राज ठाकरेंना देवू. निवडणूक लढवायला काही अडचण आहे असं वाटत नाही मात्र अंतिम निर्णय राज साहेब घेतील असंही नांदगावकर म्हणाले.

मनसेची भुमिका पूर्वीपासूनच एकला चलो रे ची आहे. राज ठाकरेंची पहिलेपासून भुमिका ही इव्हीएम वर निवडणूका होत असतील तर त्या टाळाव्या, मात्र पदाधिकारी आणि नेत्यांनी राज ठाकरेंकडे आग्रह केल्यानंतर पुनर्विचार केला जातोय असंही त्यांनी सांगितलं.

युतीचं घोडं अडलं कुठे?

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखंची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे. प्रचारात आघाडी घेतलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे सांगितलं गेलं तरी जागावाटपाचं अजून फायनल झालेलं नाही. शिवसेनेला जास्त जागा पाहिजे असून भाजप तेवढ्या जागा द्यायला इच्छुक नाही असे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसनेच्या मंत्र्यांची बैठक घेऊन आज चर्चा केली. तब्बल तासभर मंत्री आणि उध्दव ठाकरेंमध्ये चर्चा झाली. या बैठकीत उद्धव यांनी सर्व मंत्र्यांना चर्चेची माहिती दिली आणि आश्वस्त केलं की सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युती होणार आहे. मात्र बोलणी सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं अशी माहिती सूत्रांनी दिलीय. युतीचा फॉर्म्युला ठरला आहे तर युतीचं नेमकं घोडं नेमकं अडलं कुठे असा प्रश्न आता विचारण्यात येतोय.

वाचा - शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर पवारांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीचा नेता म्हणतो...

उद्धव ठाकरे म्हणाले, युती होईल अशी परिस्थिती आहे. माझी भाजप नेत्यांबरोबर बोलणी सुरू आहेत. सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास युती होईल. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा करत आहेत. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेही संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे दोन्ही पक्षांनी फार ताणून न धरल्यास पित्रूपक्ष संपल्यानंतर युतीची घोषणा होऊ शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

वाचा - ...तर भाजपला सत्तेवरून हाकलायला वेळ लागणार नाही - शरद पवार

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

युतीचा कुठलाही फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. फॉर्म्युला अंतिम झाल्यावर लोकसभेप्रमाणे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. अमित शाह या पत्रकार परिषदेला असतील की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. युतीची घोषणा कधी होईल, तर लवकरात लवकर हाच शब्द योग्य ठरेल. नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत शिवसेनेला विश्वासात घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी याआधीच स्पष्ट केलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 20, 2019, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading