14 सप्टेंबर : महाराष्ट्राची मुलं ही माझी मुलं समजतो. ते या देशाचे भविष्य आहेत, त्या मुलांच्या सुरक्षेविषयी तडजोड न करता उपाययोजना आखल्या नाहीत तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना पत्र लिहिलंय.
शाळांमध्ये होत असलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीवर होत असलेल्या अत्याचारामुळे राज ठाकरे यांनी अस्वस्थ होऊन थेट महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा, महाविद्यालयांना पत्र लिहिलंय. सरकारमधील अधिकारी सुरक्षेबाबत योजना आखण्यात अपयशी ठरलेत त्यामुळे मी थेट तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हे पत्र लिहत आहे असं राज ठाकरे यांनी या पत्रात स्पष्ट केलंय.
शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. कारण पालक एका विश्वासानं शाळांमध्ये आपली मुलं पाठवतात. तो विश्वास तुटू नये,अशा उपाययोजना करा. या संदर्भात मी आणि मनसे सर्व पातळीवरची मदत मी आपणास करायला तयार आहे. यासाठी connectrajthackeray@gmail.com मेल किंवा 022-24333699 या क्रमांकावर संपर्क करावा,असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे
नेमकं काय लिहिलंय पत्रात ?
"मुलांवरच्या अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी शाळांच्या प्रशासनानं तातडीनं उपाययोजना आखाव्यात. महाराष्ट्राची मुलं ही मी माझी मुलं समजतो. ते या देशाचे भविष्य आहेत. त्या मुलांच्या सुरक्षेविषयी तडजोड न करता उपाययोजना आखल्या नाहीत तर ते खपवून घेतलं जाणार नाही. सरकारमधील अधिकारी सुरक्षेबाबत योजना आखण्यात अपयशी ठरलेत. त्यामुळे मी थेट तुमच्याशी संवाद साधण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्य रितीने पार पाडावी. कारण पालक एका विश्वासानं शाळांमध्ये आपली मुलं पाठवतात. तो विश्वास तुटू नये ,अशा उपाययोजना करा. या संदर्भात मी आणि मनसे सर्व पातळीवरची मदत मी आपणास करायला तयार आहे. मेल किंवा पत्राद्वारे संपर्क करावा." -राज ठाकरे
महाराष्ट्रातील सर्व सरकारी व निमसरकारी शाळा व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत राजसाहेबांच पत्र.. pic.twitter.com/SfAmDQdgNh
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) September 14, 2017
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray, मनसे, महाविद्यालय, राज ठाकरे, शाळा