Mumbai Local: "ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांच्यासाठी तातडीने लोकल सेवा सुरू करा" राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Raj Thackeray letter to CM Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लोकल ट्रेन संदर्भात महत्त्वाची मागणी केली आहे.

Raj Thackeray letter to CM Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लोकल ट्रेन संदर्भात महत्त्वाची मागणी केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 जुलै : मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ट्रेन (Mumbai Local Train) सुरू करण्याची मागणी सामान्य नागरिकांसोबतच प्रवासी संघटना सुद्धा करत आहेत. याच संदर्भात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी लोकल सेवा सुरू करण्याच्या संदर्भात मागणी केली आहे. मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा निदान ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी अत्यंत तातडीने सुरू करावी अशी मागणी राज ठाकरेंनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे. पाहूयात काय म्हटलं आहे या पत्रात... राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं, गेल्या 15 महिन्यांपासून देशाप्रमाणे महाराष्ट्रात अनेक प्रकारचे निर्बंध सरकारने लागू केले आहेत. हे निर्बंध आपण सर्वच जण पाळत आलो आहोत. पण आजकाल हे निर्बंध नक्की कोणासाठी असा प्रश्न पडू लागला आहे. त्यातल्या त्यात सध्या मुंबई शहरासाठी जे निर्णय गेतले जात आहेत. ते तर अनाकलनीय आहेत. आपल्या पत्रात त्यांनी पुढे म्हटलं, मुंबईतील जवळजवळ सर्व कार्यालये सुरू आहेत. सर्वांना धरुन काम करता येणं शक्य नाही. यासाठी त्यांना रोज अनेक तास प्रवास करावा लागत आहे. त्यात लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांचे अतोनात हाल होत आहेत. महाराष्ट्र सरकारने बस सेवेला परवानगी दिली. पण लोकल बंद असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होत असते. अशा गर्दीत प्रवास केल्याने रोगही अधिक पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे बस सुरू आणि लोकल बंद ह्यानं नेमकं काय साध्य होणार? महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईची लोकल सेवा सुरू करण्यासाठी आता तातडीने पावले उचलावीत. सर्वसामान्य माणसाने आतापर्यंत खूप सहन केलं आणि त्याची सहन करण्याची क्षमता आता संपत चालली आहे. त्यामुळे आता यापुढे सरकारकडून काही सकारात्मक उपाय केले गेले नाहीत तर कडेलोट होईल. त्या परिस्थितीत माझा पक्ष मुंबईकरांसोबत तर उभा राहीलच परंतु लोकल प्रवास तातडीने सुरू करण्यासाठी आंदोलन सुरू करेल. त्यामुळे मी माझ्या पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना अशी मागणी करतो की, मुंबईकरांचे रोजचे हाल थांबवण्यासाठी मुंबईची लोकल सेवा, निदान लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा सर्वांसाठी तरी अत्यंत तातडीने सुरू केली जावी.
    Published by:Sunil Desale
    First published: