'अतिरेक्यांना ठेचा पण...', राज ठाकरेंनी रोखठोक पत्राद्वारे मोदींना केलं विशेष आवाहन

'अतिरेक्यांना ठेचा पण...', राज ठाकरेंनी रोखठोक पत्राद्वारे मोदींना केलं विशेष आवाहन

राज ठाकरेंनी हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकचं समर्थन केलं आहे, पण त्याचवेळी सरकारलाही आवाहन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरेंनी हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकचं समर्थन केलं आहे, पण त्याचवेळी सरकारलाही आवाहन केलं आहे.

'युद्ध हे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईन. अतिरेक्यांना ठेचलंच पाहिजे. पण म्हणून कोण युद्धजन्य परिस्थिती तयार करून राजकीय फायदा घेऊ नये. पाकिस्तानने त्यांच्या कैदेत असणाऱ्या आमच्या वैमानिकांना, अभिनंदन यांना तात्काळ सोडलं पाहिजे आणि सीमेवरचा गोळीबारही थांबवला पाहिजे. असं घडलं तर नरेंद्र मोदी यांनीदेखील चर्चेची ही संधी गमावता कामा नये,' असं म्हणत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केलं आहे.


दरम्यान, बुधवारी भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान हा त्या विमानाचा पायलट होता. विमान कोसळल्यानंतर तो पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.

जखमी अवस्थेतल्या अभिनंदन याचे व्हिडीओ पाकिस्तानी माध्यमांनी आणि लष्कराने व्हायरल केले होते. आंतरराष्ट्रीय करारानुसार अशा पायलटला योग्य वागणूक दिली जावी असा नियम आहे. त्याला संबंधीत देशाच्या स्वाधीन करावं असंही त्या करारामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे ती मागणी केली आहे.


VIDEO : भारताचा पाकवर एअर स्ट्राईक, अमृता फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या