Home /News /mumbai /

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरे दुसरे हिंदुह्रदयसम्राट होणार का? शिवसेनेने दिली पहिली प्रतिक्रिया

'विचार बदलून काहीही होणार नाही. हिंदुत्वापासून आम्ही दूर जात नाही आणि जाणारही नाही.'

मुंबई 23 जानेवारी : 'मसने'चं महाअधिवेशनामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झालीय. महाविकास आघाडीमुळे शिवसेना हिंदुत्वावर मवाळ झालीय. तर आता मनसे कात टाकत हिंदुत्वावर आक्रमक होणार आहे. मनसेच्या नेत्यांनी त्यावर बोलायला सुरुवात केलीय. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी तर एक पाऊल पुढे जात राज ठाकरे हे दुसरे हिंदुह्रदयसम्राट असतील असं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळे मनसेची पुढची दिशा स्पष्ट होते. हा शिवसेनेला मोठा धक्का असल्याचं मानलं जात असतानाच आता त्यावर शिवसेनेनं पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 23 जानेवारी हा बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. ते निमित्त साधून मनसेचा महामेळावा होतोय. यावर बोलताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट केवळ बाळासाहेबच आहेत आणि राहतील. दुसरे कुणी हिंदूह्रयसम्राट होवू शकत नाही. पार्टीचा झेंडा बदलून, विचार बदलून काहीही होणार नाही. हिंदुत्वापासून आम्ही दूर जात नाही आणि जाणारही नाही. कुणी काय करतंय त्याचा आमच्यावर काही फरक पडत नाही. नवा 'ठाकरे' राजकारणाच्या मैदानात 'मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा आज राजकारणात औपचारिक प्रवेश झाला. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये सर्व ठाकरे कुटुंबीय उपस्थित होतं. अमित यांच्या रुपाने आणखी एका नव्या दमाच्या 'ठाकरें'चा राजकारण प्रवेश झाला आहे. गेली काही वर्ष अमित हे पक्षात सक्रिय होते. काही आंदोलनातही ते सहभागी होते. मात्र त्यांच्यावर औपचारिक जबाबदारी देण्यात आली नव्हती. या आधी गेली काही वर्ष आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय आहेत आणि सध्या ते राज्याचे पर्यटनमंत्रीही आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणुक न लढविण्याची आणि कुठलंही सरकारी पद न घेण्याची भूमिका घेतली होती. राज ठाकरेंकडून 'राजमुद्रे'चा गैरवापर, मनसेविरुद्ध पुण्यात तक्रार दाखल नंतर मात्र राज आणि उद्धव ठाकरे यांनी नव्या पद्धतीने राजकारण केलं आणि आता ठाकरे घराण्याचा नवा सदस्य आपलं भविष्य आजमविणार आहे. गेले काही दिवस अमित यांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा सुरू होती. अधिवेशनाच्या पहिल्या भागात माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी अमित ठाकरेंची नेतेपदी निवड करण्याचा ठराव मांडला आणि त्याला सगळ्यांनी एका आवाजात पाठिंबा दिला. अजित पवारांकडे मतदारसंघातील कामे घेऊन गेले रोहित पवार, असा होता प्रतिसाद अमित यांच्या नावाची घोषणा होत असताना खाली कार्यकर्त्यांमध्ये अमित यांच्या आई शर्मिला ठाकरे, आजी, बहिण उर्वशी आणि पत्नी मिताली या बसलेल्या होत्या. अमित यांच्या नावाची घोषणा झाली आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी अमित यांच्या आई, आजी आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Raj Thackeray

पुढील बातम्या