सर्वात मोठी घडामोड, राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

सर्वात मोठी घडामोड, राज ठाकरे मातोश्रीवर दाखल

राज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचित आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले आहेत.

  • Share this:

मुंबई, 5 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या मातोश्रीवर जाणार आहेत. मुलगा अमित ठाकरे यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज ठाकरे हे मातोश्रीवर जात आहेत.

राज ठाकरे आणि शिवसेनेचं नातं महाराष्ट्राला परिचित आहे. असं असताना कौटुंबिक कारणासाठी का होईना राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले आहेत.

राज ठाकरे कुणा-कुणाला देणार अमितच्या लग्नाची पत्रिका?

राहुल गांधींची दिल्लीत भेट घेऊन त्यांना अमित यांच्या लग्नाची पत्रिका देण्याची शक्यता आहे. त्याच वेळी पंतप्रधान मोदींची भेट टाळून राज ठाकरे हे राजकीय संदेश देण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेते मिलिंद देवरा राज यांच्या दिल्ली दौऱ्याचे समन्वयक असल्याची माहिती आहे. नितीन गडकरी यांनाही ते लग्नपत्रिका देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रिका देणार का याबद्दल मात्र साशंकता आहे.

सिद्धीविनायक चरणीही ठेवली होती पत्रिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सपत्नीक सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका सिद्धीविनायकाच्या चरणी ठेवली. राज यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा मागील वर्षी 11 डिसेंबर 2017 रोजी साखरपुडा झाला होता. मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा महालक्ष्मीच्या टर्फ क्लबवर संपन्न झाला होता. आता अमित आणि मिताली हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.


पाहा आणखी व्हिडिओ:

VIDEO : राज ठाकरे मोदींना टाळून राहुल गांधींना देणार का मुलाच्या लग्नाची पत्रिका?संबंधित बातम्या:

VIDEO: मराठी माणूस लवकरच होणार पंतप्रधान : मुख्यमंत्री


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 5, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या