Home /News /mumbai /

Raj Thackeray Health Update : राज ठाकरेंची प्रकृती उत्तम, उद्याच मिळणार डिस्चार्ज

Raj Thackeray Health Update : राज ठाकरेंची प्रकृती उत्तम, उद्याच मिळणार डिस्चार्ज

पाठीचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर होते.

    मुंबई, 10 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray admitted ) यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (Lilavati hospital mumbai ) दाखल करण्यात आले आहे. पाठीचा त्रास होत असल्यामुळे आज संध्याकाळी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पण, आता त्यांची प्रकृती उत्तम असून छोटीशी शस्त्रक्रिया करून उद्या रविवारीच डिस्चार्ज दिला जाणार आहे. राज ठाकरे यांना पाठीचा त्रास होत असल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया पार पडणार आहे. उद्या रविवारीच त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली. रणवीर सिंह आहे दीपिकाचा नंबर वन फॅन; बायकोची वेबसाईट लाँच होताच काय म्हणाला पाहा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मध्यंतरी मनगटाला दुखापत झाली होती. त्यानंतर आता पाठीचा त्रास उद्भवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे गैरहजर होते. राज यांना तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे, राज यांना पाठीचा त्रास होत आहे. त्यांना मणक्याच्या त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. धक्कादायक! लस शिल्लक नसल्याचं सांगत 80 वर्षांच्या वृद्धेला मुंबईत परत पाठवलं जानेवारी महिन्यात  राज ठाकरे यांना टेनिस खेळताना त्यांच्या हाताला दुखापत झाली  होती. त्यांच्या डाव्या हाताला ही दुखापत झाली होती. ही दुखापत फार मोठी नसली तर हातावर सुज आल्याने  तातडीनं हिंदुजा हॉस्पिटलमध्ये यावर उपचार घेतले होते यापूर्वी राज ठाकरे यांना अशाप्रकारची दुखापत झाली होती. त्यावेळी त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला टेनिस एल्बोचा त्रास झाला होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज ठाकरे यांच्या हाताला लावलेल्या सपोर्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: MNS, Raj Thackeray

    पुढील बातम्या