मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'रा..रा..चलं करू तयारी' तुम्हालाही ठेका धरायला लावले, मनसेच्या नव्या गाण्याची झलक, VIDEO

'रा..रा..चलं करू तयारी' तुम्हालाही ठेका धरायला लावले, मनसेच्या नव्या गाण्याची झलक, VIDEO

 गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी लक्षवेधीच असतो. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार?

गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी लक्षवेधीच असतो. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार आहे. आज या सभेत मनसेकडून नवीन गाणं लाँच केलं जाणार आहे

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार आहे. आज या सभेत मनसेकडून नवीन गाणं लाँच केलं जाणार आहे. पण त्याआधी मनसेच्या या नव्या कोऱ्या गाण्याची झलक पाहण्यास मिळाली आहे. नव्या दमाने हे गाणं तयार करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा हा दरवर्षी लक्षवेधीच असतो. त्यामुळे राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आजची सभा ही मनसेसाठी नवी उभारी देणारी ठरणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावर जम पकडला आहे. त्यामुळे आज शिवतीर्थावर सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.

राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. आज शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पक्षाचं नवीन स्फूर्तीगीत सादर केले जाणार आहे. टायगर अभी जिंदा है, असं बाळा नांदगावकर म्हणतात आणि गाण्याला सुरुवात होते. 'चलं करू तयारी, घेऊ नवी उभारी' अशी या गाण्याची चाल आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हे गाणं डोक्यावर घेण्यात आलं आहे. सोशल मीडियावर मनसे सैनिकांकडून हे गाणं व्हायरल झालं आहे.

2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या तोंडावरही मनसेकडून असा प्रयत्न झाला होता. महापालिकेच्या निवडणुकीच्या राज ठाकरे यांनी शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण, उद्धव ठाकरे यांनी टाळी दिली नाही. त्यानंतर पालिका निवडणुकीला सामोरं जात असताना 'एकटा पडलाय राजा, राजाला साथ द्या' असं साद घालणारं गाणंच मनसेनं जाहीर केलं होतं. खुद्द राज ठाकरे यांच्या उपस्थिती हे गाण प्रसिद्ध झालं हे विशेष. अवद्धुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांच्या आवाज हे गाणं रेकाॅर्ड करण्यात आलं होतं.

अयोध्या दौऱ्याची घोषणा होणार?

गेल्या 7 महिन्यात बदलेलं सरकार उद्धव ठाकरेंसोबतची काँग्रेस-राष्ट्रवादीची जवळीक यावर भावावर राज ठाकरे काय बाण सोडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.  शिवसेनेतली बंडखोरी, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर राज ठाकरे टीका करणार का? याचीही उत्सुकता लागून असणार आहे. तसंच महापालिका निवडणूक आणि आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या अनुषंगाने राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर करु शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.

First published:
top videos