Home /News /mumbai /

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेला गुजराती समाजाचा पाठिंबा, समर्थनार्थ लावले बॅनर्स

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेला गुजराती समाजाचा पाठिंबा, समर्थनार्थ लावले बॅनर्स

Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणातून हिंदुत्ववादी भूमिका मांडत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यानंतर त्याचे पडसाद केवळ राज्यातच नाही तर देशभरातील विविध ठिकाणी दिसून आले.

पुढे वाचा ...
मुंबई, 24 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भात भाष्य केलं. त्यानंतर ठाण्यातील सभेतून 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यातच आता गुजराती समाजाने मुंबईत बॅनर्ल लावत राज ठाकरेंच्या भूमिकेचं जाहीर समर्थन केलं आहे. (Gujarati comminity puts banner supporting Raj Thackeray) गुजराती समाजाकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सवर हिंदुह्रदयसम्राट राजसाहेब ठाकरे असा उल्लेख सुद्धा कऱण्यात आला आहे. तसेच राज ठाकरेंनी भोंग्यांच्या बाबत घेतलेल्या मुद्द्याला आपलं समर्थन असल्याचं ही म्हटलं आहे. वाचा : राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध, औरंगाबादमध्ये 'राज' गर्जना होणार की नाही? नेमकं काय लिहिलं आहे बॅनरवर? राजसाहेब ठाकरेंना जाहीर समर्थन! अखंड हिंदुंचं रक्षण करणारे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंनतर हिंदूंचे रक्षणकर्ते आता फक्त हिंदुहृदयसम्राट मा.श्री. राजसाहेब ठाकरे हेच आहेत. हिंदुहृदयसम्राट मा. श्री.राजसाहेब ठाकरे यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्याला आम्ही जाहीर समर्थन करीत आहोत. राज ठाकरेंचा इशारा, "3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही तर..." राज ठाकरेंनी रविवारी (17 एप्रिल) पुण्यातील पत्रकार परिषदेत म्हटलं, हा विषय वर्षांपासून तसाच राहीलेला आहे. मला असं वाटतं की, तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल दिवसातून पाच वेळा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील माझ्या सर्व हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की, तयारीत रहा. 3 तारखेला.. आता त्यांचा रमजान सुरू आहे. परंतू 3 तारखेपर्यंत जर त्यांना समजलं नाही, कळालं नाही आणि या देशातील कायदा, न्यायव्यवस्थेपेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर यांना मोठा वाटत असेल तर मला असं वाटतं जशास तसं उत्तर देणं तितकंच गरजेचं आणि आवश्यक आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमची तयारी सुरू आहे... महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमची तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात किंवा देशात आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली, हाणामारी नकोयत. देशातील शांतता भंग करण्याची आमची इच्छा नाहीये. माणुसकीच्या नाताने मला असं वाटतं की, मुस्लिम धर्मियांनी या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कुणीही विरोध केलाला नाहीये. त्यांना वाटत असेल की लाऊडस्पीकर वरुनच आम्ही ऐकवणार आहोत तर मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकर वरुण ऐकाव्या लागतील असंही राज ठाकरे म्हणाले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: MNS, Mumbai, Raj Thackeray

पुढील बातम्या