• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देताना राज ठाकरे झाले भावुक, VIDEO

लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देताना राज ठाकरे झाले भावुक, VIDEO

ग्रेड डेन जातीचे त्यांच्याकडे 3 श्वान होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन या दोघांचा आधीच मृत्यू झाला.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं श्वानावरील प्रेम हे सर्वश्रुत आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जातीची श्वान आहे. पण त्यांचा लाडका होता तो ग्रेट डेन जातीचा जेम्स. सोमवारी रात्री जेम्सचं ( james dog) निधन झालं. आपल्या या लाडक्याला श्वानाला परळच्या वन्य रुग्णालयात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज ठाकरे यांचा जेम्स नावाचा ग्रेट डेन जातीचा श्वानाचं सोमवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने गेला. राज ठाकरे यांच्याकडे या प्रजातीचे तीन श्वान होते. त्यापैकी हा शेवटचा होता. राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे श्वान प्रेम सर्वश्रृत आहे. ते या श्वानांना आपल्या घरातील सदस्य प्रमाणे वागवतात. दोन वर्षांपूर्वी ग्रेट डेन जातीच्या बाँन्ड नावाच्या श्वानाचे निधन झाले होते. त्यानंतर आता जेम्सनेही अखेरचा श्वास घेतला. आज या श्वानावर अंत्यासंस्कार करण्यात आले. यावेळी ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या श्वानाला शेवटचा निरोप दिला. जेम्सच्या डोक्याला कुरवाळत राज यांनी फुलं वाहिली. यावेळी राज ठाकरे भावुक झाले होते. 'हे' आहेत बॉलिवूडचे सर्वात वादग्रस्त ब्रेकअप; कधीकाळी एकमेकांच्या प्रेमात राज ठाकरे अनेक वेळा जेम्सला आपल्यासोबत घेऊन जात होते. तरुणपणापासून राज यांचे अनेक फोटो आहे. ग्रेड डेन जातीचे त्यांच्याकडे 3 श्वान होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन या दोघांचा आधीच मृत्यू झाला. ग्रेट डेन जातीचे जेम्स आणि बॉण्ड राज ठाकरेंचे अतिशय लाडके होते. एवढंच नाहीतर रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीही राज यांच्या गाडीत खास बिस्किटांचा डबा असतो. घरच्या सदस्यांप्रमाणेच पाळीव श्वानांचे वाढदिवसही साजरे होतात.
  Published by:sachin Salve
  First published: