घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज ठाकरेंची फेसबुकवर एंट्री

घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज ठाकरेंची फेसबुकवर एंट्री

येत्या २१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच फेसबुक पेज लाँच करणार आहेत.

  • Share this:

19 सप्टेंबर : घसरलेल्या इंजिनला ट्रॅकवर आणण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अखेर कामाला लागले आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे आता फेसबुक पेज सुरू करणार आहे.

येत्या २१ सप्टेंबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतःच फेसबुक पेज लाँच करणार आहेत. मुंबईतील दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर इथं सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास फेसबुक पेज लाँचिंगचा सोहळा होणार आहे.

मागील लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं. "आता हा शेवटचा पराभव" असं सांगत राज ठाकरे यांनी पक्षाच्या मोर्चेबांधणीला नव्याने सुरुवात केलीये. आता राज ठाकरे स्वत: फेसबुक पेजवर एंट्री घेत आहेत. त्यामुळे त्यांची व्यंगचित्र,भाषण पाहण्यास मिळणार यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 09:30 PM IST

ताज्या बातम्या