Home /News /mumbai /

Sachin vaze प्रकरणात कल्पनेपलीकडचे चेहरे समोर येतील, राज ठाकरेंचं मोठं विधान

Sachin vaze प्रकरणात कल्पनेपलीकडचे चेहरे समोर येतील, राज ठाकरेंचं मोठं विधान

'परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून बाजूला का करण्यात याचे उत्तर सरकारने दिले नाही. जर त्यांचा सहभाग होता तर..'

    मुंबई, 21 मार्च : मुंबईचे (Mumbai Police)माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांना बारचालकांकडून पैसे वसूल करायला सांगणे हे अत्यंत घाणरेडे आहे, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. तसंच, केंद्राने या प्रकरणाची नीट चौकशी केली तर कल्पनेपलीकडचे चेहरे समोर येतील, असं सूचक विधानही राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर टीका करत अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे. 'माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे राज्यात काय देशाच्या इतिहासात अशी घटना घडली नसेल.  परमबीर सिंग यांना एक वर्ष झाले आहे. त्या हिशेबाने पाहिले तर 1200 कोटी झाले असतील. गृहमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना सांगणे हे मुंबई पुरते आहे. राज्यात अनेक जिल्हे आहे तिथे सुद्धा असे प्रकार घडले असतील. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन कसून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? दिल्लीच्या बैठकीआधी जयंत पाटलांचे मोठे विधान 'पोलिसांमधील भांडणे, पोलिसांच्या आतील बातम्या बाहेर येत आहे. पण मायकल रोडवर स्फोटकांनी भरून गाडी ठेवणे हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून बाजूला का करण्यात याचे उत्तर सरकारने दिले नाही. जर त्यांचा सहभाग होता तर त्यांची चौकशी का केली नाही. या प्रकरणात त्यांचा सहभाग होता तर बदली का केली. अंगावर आले म्हणून झटकले हे असं झालं आहे, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. 'मायकल रोडवर जी स्फोटकं कारमध्ये सापडली होती. ती स्फोटकं आली कुठून हा मोठा प्रश्न आहे. याचे उत्तर अजूनही समोर आले नाही, असंही राज ठाकरेंनी म्हणाले. 'निलंबित असलेल्या सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खास होता. सचिन वाझे यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी कोण घेऊन गेलं होतं, हे समोर आलं पाहिजे' असा थेट सवाल सेनेला विचारला आहे. 'मायकल रोडवर स्फोटकांनी भरलेली गाडी तिथे कुणी ठेवायला सांगितली,  एक पोलीस अधिकारी हे सगळं करतोय हे गंभीर आहे. हे कुणाच्या सांगण्यावरून झाले हे समोर आलं पाहिजे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, राज्य सरकारकडून या प्रकरणाचा तपास होणार नाही. केंद्राने जर चौकशी केली तर फटाक्याची माळ लागेल, या प्रकरणाचा नीट तपास केला तर कल्पनेपलीकडेच चेहरे समोर येतील, असंही राज ठाकरे म्हणाले. खाद्यतेलाचा टँकर पलटी होताच तेल घेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड, Video Viral 'पोलीस हे परस्पर हे काम करू शकत नाही. हे कुणाच्या सांगण्यावरून काम करण्यात आले आहे. स्फोटकांनी कार सापडल्यानंतर जे धमकी पत्र दिले आहे त्यामध्ये आदराने भाषा वापरण्यात आली आहे. गुजराती व्यक्तीने हे पत्र लिहिले असावे, असा अंदाज शब्दांवरुन  येत आहे, असंही राज ठाकरे म्हणाले. 'गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना शहरातील बार-रेस्टारंटकडून पैसे वसूल करण्यास सांगणे हे अत्यंत घाणरेडे आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे. केंद्र सरकारने या प्रकरणी सखोल चौकशी करून या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. या प्रकरणाचा तपास योग्य झाला नाहीतर लोकांना कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास बसणार नाही, असं मतही राज ठाकरेंनी व्यक्त केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: मनसे, राज ठाकरे

    पुढील बातम्या