Home /News /mumbai /

'मनसे'च्या शॅडो कॅबिनेटची घोषणा, अशी आहेत नेत्यांची नावं

'मनसे'च्या शॅडो कॅबिनेटची घोषणा, अशी आहेत नेत्यांची नावं

Navi Mumbai: MNS Chief Raj Thackeray during Paschim Maharashtra Mahotsav at Sanapada in Navi Mumbai, Saturday, Feb. 22, 2020. (PTI Photo)(PTI2_22_2020_000190B)

Navi Mumbai: MNS Chief Raj Thackeray during Paschim Maharashtra Mahotsav at Sanapada in Navi Mumbai, Saturday, Feb. 22, 2020. (PTI Photo)(PTI2_22_2020_000190B)

अमित ठाकरे यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

    मुंबई 09 मार्च :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहुप्रतिक्षित शॅडो कॅबिनेटची घोषणा आज राज ठाकरे यांनी केली. नवी मुंबईत पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी ही घोषणा केली. त्यात पक्षाच्या महत्त्वाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात आलं आहे. येत्या एप्रिल मध्ये नवी मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीत उत्तम कामगिरी करून आपला भगवा झेंडा राज्यभर नेऊया असं आवाहन बाळ नांदगावकर यांनी यावेळी बोलताना केलं. राजसाहेबांची वाणी तलवारीसारखी चालत असते आणि त्या वाणीच्या आदेशानुसार महाराष्ट्र सैनिक देखील धारधार कामगिरी करूया असंही त्यांनी सांगितलं. असं आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट वित्त आणि गृहनिर्माण - नितीन सरदेसाई जलसंपदा अनिल शिदोरे गृह, विधी व न्याय, सामान्य प्रशासन बाळा नांदगावकर महसूल आणि परिवहन - अविनाश अभ्यंकर सहकार आणि पणन - दिलीप धोत्रे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण - रिटा गुप्ता शालेय उच्च शिक्षण - अभिजित पानसे नगर विकास आणि पर्यटन - संदिप देशपांडे , अमित ठाकरे कामगार - राजेंद्र वागसकर , गजानन राणे , सुरेंद्र सुर्वे वने आपत्ती व्यवस्थापन , मदत पुनर्वसन - अमित ठाकरे , संजय चित्रे , संतोष धुरी ग्रामविकास - अमित ठाकरे उर्जा - शिरीष सावंत , सागर देवऱह सांस्कृतिक कार्य - अमेय खोपकर रोजगार हमी आमि फलोत्पादन - बाळा शेडगे सार्वजनिक उपक्रम - संजय शिरोडकर सार्वजनिक बांधकाम - योगेश परुळेकर सामाजिक न्याय - गजानन काळे महिला बालविकास - शालिनी ठाकरे , सुनीता चुरी अन्न नागरी पुरवठा - राजा चौघुले उत्पादन - वसंत फडके आदिवासी विकास - आनंद एंबडवार पर्यावरण - रुपाली पाटील, किर्तीकुमार शिंदे, देवव्रत पाटील पाण पुरवठा - अरविंद गावडे केतन जोशी - सामान्य प्रशासन आणि इतर महत्त्वाचे विभाग
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Raj Thackeray

    पुढील बातम्या