नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, बाळासाहेबांच्या नावाऐवजी हे नाव योग्यच!

नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावर राज ठाकरेंनी काढला तोडगा, बाळासाहेबांच्या नावाऐवजी हे नाव योग्यच!

'विमानतळ पहिल्यांदा झालं पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतंय ते बघूया'

  • Share this:

मुंबई, 21 जून : नवी मुंबई विमानतळाच्या (navi mumbai airport name controversy) नामांतरावरून वाद पेटला आहे. पण, या नवी मुंबई विमानतळ हे शहरातच आहे, मुंबईच्य विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji airport terminal) यांचं नाव आहे, तेच नाव नवी मुंबईच्या विमानतळाला असणार आहे, आता हा विषय संपला आहे, असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांनी जाहीर केले आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही यासाठी सहमत दर्शवली आहे.

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.  नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीला मनसेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेतली.

रोहितला 'ते' करताना पाहून रितिका म्हणाली, 'आमच्यावर पाळत ठेवत आहेस का?'

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 'नवीन होत असलेल्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी आहे. राज्य सरकारकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackery) यांचं नाव देण्याचा आग्रह आहे. मी त्यांच्यापुढे वस्तुस्थिती ठेवली. नवीन विमानतळे ही शहराच्या बाहेर होत असतात. जरी ते विमानतळ नवी मुंबईत होत असले तरी ते मुंबईचे विमानतळ असणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

'आता जसं छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे तेच नाव तिकडे असणार आहे. मुंबईतील विमानतळ हे डोमेस्टीक असेल आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे नाव देणे उचित असेल, ते विमानतळ या विमानतळाचा भाग आहे. त्याचा कोड BOM हेच असणार आहे, असंही राज ठाकरे यांनी समजून सांगितलं.

‘मुलांना एकटं सोडून आफ्रिकेत मजा मारतेय’; अभिनव श्वेता तिवारीवर भडकला

'विमानांना पार्किंगला जागा नाही म्हणून मुंबई विमानतळाची ही अवस्था आहे. आज महाराजांच्या नावावर चर्चा काय करायची. विमानतळ पहिल्यांदा झालं पाहिजे. आता माझ्या बोलण्यानंतर कोण रस्त्यावर उतरतंय ते बघूया, असा इशाराही राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत दिला.

Published by: sachin Salve
First published: June 21, 2021, 1:24 PM IST

ताज्या बातम्या