S M L

राज ठाकरेंच्या कुंचल्यातून मोदींना 'फटकारे' अन् गडकरींना 'चिमटा'

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून मोदी सरकारवर निशाणा साधलाय

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2017 10:19 PM IST

राज ठाकरेंच्या कुंचल्यातून मोदींना 'फटकारे' अन् गडकरींना 'चिमटा'

31 आॅक्टोबर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. विशेष म्हणजे या व्यंगचित्रात नितीन गडकरींचाही समावेश आहे.

अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशभरातील पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांमध्ये पारदर्शकता आवश्यक असल्याचं राजकीय पक्षातील लोकशाहीवर भाष्य केलं होतं. याचाच धागा पकडून राज ठाकरे यांनी भाजपला फटकारून काढलं.

राज ठाकरेंनी भाजपच्या चिंतन बैठकीत नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना कसा दम भरतात असं दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे, या व्यंगचित्रात नितीन गडकरींना भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आलंय. राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची मैत्री सर्वश्रूत आहे. यावेळी मात्र, गडकरींना व्यंगचित्रात समावेश करून चांगलाच चिमटा काढलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 10:19 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close