मुंबई, 06 जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावर आपल्या कुंचल्यातून फटकारलंय. अमित शहांच्या बकेट लिस्टरमध्ये सर्वसाधारण कार्यकर्त्यांना भेटणार का असा प्रश्न राज यांनी उपस्थितीत केलाय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात अमित शहांची बकेट लिस्ट रेखाटली आहे. या दौऱ्यात लतादीदी, माधुरी दीक्षित, रतन टाटा, कपील देव, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मिल्खा सिंग यांची भेट होणार असल्याची यादी दाखवलीये. पण सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता ताटकाळत उभा असल्याचं दाखवण्यात आलंय.
अमित शहांची हीच का बकेट लिस्ट ? असा सवाल राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून उपस्थितीत केलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा