मुंबई, 08 जून : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर निशाणा साधलाय.
राज ठाकरे यांनी 'भेट आणि मन की बात' या आशयाखाली हे व्यंगचित्र रेखाटले आहे. राज यांनी आपल्या याव्यंगचित्रात अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची गळाभेट दाखवली. पण दोन्ही नेते एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत असल्याचं दाखवलंय.
तसंच ज्या प्रकारे शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिश्यातच राहिले होते तसेच राजीनामे उद्धव ठाकरे यांच्या खिश्यातही राहिल्याचं राज ठाकरेंनी रेखाटलंय.
याआधीही राज ठाकरे यांनी शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी अमित शहांची भेटीची 'बकेट लिस्ट' रेखाटली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा