S M L

राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2017 10:53 AM IST

राज ठाकरेंनी कृष्णकुंजवर बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

20 एप्रिल :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची आज पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज इथं महत्त्वाची बैठक होणार आहे.

गेल्या काही दिवसांत मनसे नेत्यांनी मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. यात कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत आपला रोष पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहोचवला होता. या सगळ्या विषयांची चर्चा आजच्या बैठकीत होणार असल्याचं समजतंय.

तसंच पक्षाचे नेते शिशिर शिंदे यांच्या नाराजीबद्दलही चर्चा होणार असल्याचं कळतंय. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान भांडुप परिसरातील उमेदवार निवडीत शिंदे यांचं मत लक्षात न घेतल्यानं ते नाराज आहेत. त्याबद्दलही या बैठकीत चर्चा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 10:53 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close