मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Raj Thackeray: 5 जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, स्वत: राज ठाकरेंनी ट्विट करुन दिली माहिती

Raj Thackeray: 5 जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, स्वत: राज ठाकरेंनी ट्विट करुन दिली माहिती

BREAKING: राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत मोठी बातमी, दौरा तूर्तास स्थगित

BREAKING: राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत मोठी बातमी, दौरा तूर्तास स्थगित

Raj Thackeray Ayodhya Tour: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचा 5 जून रोजीचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित (Raj Thackeray Ayodhya Tour postponed) करण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर आता प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला दौरा स्थगित करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम आहेत. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. दौऱ्याची पुढील तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे. 5 जूनच्या अयोध्या दौऱ्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं, "तूर्तास अयोध्या दौरा स्थगित... महाराष्ट्र सैनिकांनो, या! यावर सविस्तर बोलूच... रविवार दि. 22 मे, सकाळी 10 वा. स्थळ - गणेश कला क्रीडा केंद्र, पुणे"

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या पायाला झालेल्या दुखापतीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुणे दौरा अर्धवट दौरा सोडून मुंबईत आले. डॉक्टरांकडून राज ठाकरे यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ही शस्त्रक्रिया कधी करायची याबाबत निर्णय राज ठाकरे घेत आहेत.

वाचा : राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेपूर्वी मनसेला शिवसेनेचा 'दे धक्का'

राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच मनसेकडून या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली. त्यासाठी जवळपास 11 ट्रेन्स सुद्धा बूक करण्यात आल्या. तसेच अयोध्या दौऱ्याला येणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंदणी सुद्धा सुरू झाली. मात्र, आता प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरेंचा हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा : Raj Thackeray यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजपत मतभेद, एका खासदाराचा विरोध तर दुसऱ्याने केली स्वागताची तयारी

भाजप खासदाराचा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध

राज ठाकरेंनी हिंदुत्वाची आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा सुद्धा केली. मात्र, या दौऱ्याला भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. उत्तरभारतीयांना झालेल्या मारहाण प्रकरणात जोपर्यंत राज ठाकरे उत्तरभारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत उत्तरप्रदेशात येऊ देणार नाही अशी भूमिका बृजभूषण यांनी घेतली आहे.

First published:
top videos

    Tags: Ayodhya, MNS, Raj Thackeray