Elec-widget

राज ठाकरेंनी आपल्या एकमेव नगरसेवकाला विचारलं,"...त्यांना, मी काय दिलं नाही ?"

राज ठाकरेंनी आपल्या एकमेव नगरसेवकाला विचारलं,

"मी मनसे 100 टक्के सोडणार नाही. नव्या जोमाने काम करीन. पुढील 5 वर्ष मीच मनसेचे नगरसेवक राहील"

  • Share this:

13 आॅक्टोबर :...मी यांना काय दिलं नाही,कधी काही कमी पडू दिलं का ? असा उद्गिन सवाल राज ठाकरे यांनी विचारला मनसेचे एकमेव राहिलेल्या नगरसेवकाला...

भांडूप पोडनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. भांडूपची जागा जिंकल्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढलं. त्यामुळे पालिकेत सत्तेचं  समिकरण बदलणार हे निश्चित होतं. भरातभर म्हणजे भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी येणाऱ्या काळात भाजपचाच महापौर होईल असा दावा ठोकला होता.

आज शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत मनसेचे सहा नगरसेवक फोडले आणि आपल्या तंबूत दाखल केले. मनसेचे फक्त सात नगरसेवक होते आता एकच नगरसेवक उरलाय. संजय तुर्डे असं या नगरसेवकांचं नाव आहे.

'दिलीप लांडे विश्वासघातकी'

संजय तुर्डे यांनी घडलेली सगळी हकीकत आयबीएन लोकमतला सांगितली. फोडाफोडी होण्याआधी गटनेते दिलीप लांडे यांनी राजगडावर सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली होती. तेव्हा आम्ही सगळे आमच्या प्रभागात चांगले असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी राज ठाकरे यांना निरोप कळवतो असं सांगितलं होतं. पण दोन-तीन दिवसांपासून काही तरी वेगळंच घडत असल्याची पाल चुकचुकली होती. मामा लांडे हे राज ठाकरेंचे खास विश्वासू होते. ते असं काही करतीला याचा अंदाजा नव्हता. आज आमचे सगळे नगरसेवक सोडून गेले. यांचं दु:ख वाटतं.

Loading...

राज ठाकरे म्हणाले...

राज ठाकरे यांची सकाळी भेट झाली. त्यावेळी त्यांना मला फक्त विचारलं. "काय मी दिलं नाही जे हे मला सोडून गेले. यांना कधी काही कमी केलं का ?" असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. त्यावर साहेब तुम्ही काहीच कमी केलं नाही. त्यांना पचवता आला नाही असं मी म्हटलं होतं.

'5 वर्ष मीच मनसेचा नगरसेवक असणार'

आमचं पक्षकार्यालय आता काढून घेतलं जाईल. याचं दु:ख आहे. पण मी मनसे 100 टक्के सोडणार नाही. नव्या जोमाने काम करीन. पुढील 5 वर्ष मीच मनसेचे नगरसेवक राहील असंही ठामपणे संजय तुर्डे यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...