मुंबई, 02 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA Goverment) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी रंगली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांची भेट आज होता होता टळली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी विधान भवनात येणार होते. पण राज ठाकरे विधान भवनात आल्यावर त्यांना कोविड 19 संसर्ग RTPCR चाचणी करणे आवश्यक होती. पण राज ठाकरे यांनी ही चाचणी केली नसल्यामुळे त्यांना विधान भवनात येता आलं नाही.
मोदींव्यतिरिक्त अमेरिका, इस्राईलसह कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतलीये लस?
राज ठाकरे या आधीच मास्क घालत नव्हते. त्यामुळे विधान भवनात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला जे नियम आवश्यक करण्यात आलेत त्यांचं पालन राज ठाकरे करणार होते का? हा देखील प्रश्नं विधान भवनात चर्चेत होता.
पण अखेर RTPCR चाचणी केली नसल्यामुळे राज ठाकरे विधान भवनात आलेच नाहीत. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट त्यामुळे आज होऊ शकली नाही.
वीज बिल प्रश्नासह अन्य मुद्यांवर मनसेनं आक्रमक आंदोलनं केली होती. राज्यासंबंधी काही प्रश्नांवर राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार होते. पण, आरटीपीसीआर चाचणी न केल्यामुळे राज ठाकरेंनी विधानभवनात येता आले नाही.
शिवसेनेकडून जीवाला धोका, खटले हिमाचल प्रदेशमध्ये चालवावे, कंगनाची मागणी
विशेष म्हणजे, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शिवाजी पार्कात आयोजित कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी समोर प्रचंड गर्दी असतानाही राज ठाकरेंनी तोंडाला मास्क लावलेला नव्हता. तुम्ही मास्क का लावला नाही, या पत्रकाराच्या प्रश्नावरही राज ठाकरेंनी उत्तर दिलं. मी मास्क लावतंच नाही, तुम्हाला सांगतोय, असं म्हणत राज यांनी काढता पाय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj thackarey, Uddhav Thackery, मनसे